MPSC Success Story: आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. आई वडिलांच्या याच कष्टाची परतफेड करत काही मूल अशक्य असं काहीच नाही दाखवून देतात. अशातच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय पूर्ण करता येतं हे सिद्ध करुण दाखवलं आहे, बीडमधील अधिकारी संतोष खाडे याने. बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट गावच्या संतोष खाडेच्या यशाची जोरदार चर्चा आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलाने एमपीएससीच्या निकालात एनटी-डी प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवलाय. याच अधिकारी संतोष खाडे यांचा वडिलांसोबतचा व्हिडीओ व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे.
संतोषचे आई-वडील गेल्या ३० वर्षांपासून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. संतोषला बालपणी एकतरी आज्जीसोबत किंवा ऊसाच्या फडात रहावं लागलं. याच संघर्षातून कष्ट करत त्याने हे यश मिळवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता संतोषने रिझल्ट लागल्यानंतर आनंदात त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेतलं आहे. हा व्हिडीओ संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “ज्या बापामुळे यश मिळालं ….त्या बापाला डोक्यावर घेतलं तो क्षण” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video viral: आई मनाचा ‘बाप’माणूस! लेकीला पोटाशी घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा संघर्ष
आई-वडिलांच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी हे यश महत्त्वाचं असल्याचं संतोषने सांगितलं. तसेच अधिकारी झाल्यानंतर ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी काम करण्याची इच्छा संतोषने बोलून दाखवली. आई आणि बापुचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलंय. तेव्हा मी कुठे इथपर्यंत पोहोचलोय. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहीलेलं माझं सावरगाव घाट हे गाव या गावाला मी कधीच विसरू शकत नसल्याचे संतोष खाडे याने म्हटले आहे.