अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. पण आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांचे ट्विट. डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांनी केलेले अर्ध्याधिक ट्विट हे आक्षेपार्ह असतात पण यावेळी मात्र त्याने कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केले नाही पण तरीही त्यांचे ट्विट चर्चेत आहे.  आपली मुलगी इवांकावर स्तुतीसुमने उधळणारे ट्विट त्यांनी केले पण हे ट्विट् करताना त्यांनी इवांकाला टॅग करण्याऐवजी चुकून भलत्याच इवांकाला टॅग केले, त्यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : मृत्यूपूर्वी जुळ्या भावाचे बहिणीसोबत शेवटचे क्षण कॅमेरात कैद

आपली मुलगी इवांका हिचे कौतुक करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले. इवांका ही चांगली आणि उच्च अभिरुची असलेली महिला आहे. ती खरंच थोर आहे. अशा प्रकारचे कौतुक ट्रम्प यांनी केले होते. पण या ट्विटमध्ये त्यांनी आपली मुलगी इवांका ट्रम्प हिला टॅग करण्याऐवजी इवांका मॅजिक नावाच्या मुलीला टॅग केले त्यामुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. यावर इवांका मॅजिक या महिलेने तुम्ही जबाबदार माणूस असून यापुढे ट्विट करताना काळजी घ्या असा टोला  ट्रम्प यांना लगावला. त्यामुळे ट्रम्पचे अधिक हसू झाले.

वाचा : अहो आश्चर्यम… हे विमानतळ की रेल्वेरुळ?

डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका हिचे ट्विटर हँडल @IvankaTrump असे आहे, तर इवांका मॅजिक हिचे टिविटर @Ivanka असे आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत इवांका मॅजिक या महिलेने आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी समजून अनेकजण टॅग करतात अशी तक्रार केली. अमेरिकन निवडणुकांच्यावेळी देखील मला ट्रम्पची मुलगी समजून अनेकांनी टॅग केले होते असेही इवांका मॅजिकने बोलून दाखवले. त्यातून राष्ट्रध्यक्षांनी तिला टॅग केल्यानंतर मात्र इवांका मॅजिक सोशल मीडियावर चर्चेत आली.

Viral Video : अबब! पर्यटकांसमोर आली अजस्त्र मगर