मिसेस इंडिया वर्ल्डचे लास वेगास येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची विजेता अमेरिकेची शिलिन फोर्ड ठरली. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवदीप कौरने टॉप १५ मध्ये स्थान मिळवले. यासोबतच नवदीप कौरला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा स्पर्धेतून नवदीप कौरची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या चित्रांमध्ये, नवदीपने “कुंडलिनी चक्र” द्वारे प्रेरित सोन्याचा पोशाख परिधान केला होता.
“मिसेस वर्ल्ड २०२२” च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नवदीपचे फोटो शेअर करून ही माहिती देण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये – “मिस इंडियाचा राष्ट्रीय ड्रेस सादर करत आहोत. मिसेस वर्ल्डमध्ये नवदीप कौरने “कुंडलिनी चक्र” द्वारे प्रेरित हा अवांत गार्डे ड्रेस परिधान केला आहे.”
नवदीप कौरने “कुंडलिनी चक्र” द्वारे प्रेरित अवंत-गार्डे ड्रेस परिधान केला होता. पायापासून मुकुटापर्यंत, हा पोशाख शरीराच्या चक्रांद्वारे उर्जेचा प्रवाह दर्शवितो. याआधी नवदीप कौरने मिसेस इंडिया २०२०-२१ हा किताब जिंकला आहे.