भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर एक ‘मास्टर टॅक्टीशियन’ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळताना कितीही कठीण परिस्थिती असली तरी एमएस धोनी सर्व काही सहजतेने हाताळतो. पण त्याचं ज्ञान केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही. त्याने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, लग्नाळू पोरांना आगळावेगळा सल्ला दिला आहे. या मुलाखतीची छोटीशी व्हिडीओ क्लिप सोशल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यामध्ये एमएस धोनी एका कार्यक्रमाला उपस्थित असून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. ज्यामध्ये उपस्थित सर्व लग्नाळू पोरांना एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. सल्ला देताना धोनी म्हणाला, तुम्हाला कुणी भेटलं असेल आणि तुम्ही खरंच आनंदी असाल, तर प्लिज लग्न करा. इथे जे मुलं बॅचलर आहेत किंवा त्यांना प्रेयसी आहे, अशा मुलांचे काही गैरसमज असतात, ते मी दूर करू इच्छितो. माझी प्रेयसी सगळ्यात वेगळी आहे, असा विचार अजिबात करू नका. (ये मत सोचना की मेरी वाली अलग है)

धोनीच्या या सल्ल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. रिजि (RIGI) या युट्युब चॅनेलने महेंद्र सिंगची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.