भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा चर्चेत आहे. झालं असं की नुकतीच धोनीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी या फोटोवरुन धोनी राजकीय इनिंग तर सुरु करणार नाही ना यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये धोनी आणि अमित शाह हस्तांदोलन करताना दिसत आहेत. चेन्नईमधील एका कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली. इंडिया सिमेंट्स या कंपनीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही मान्यवर उपस्थिती होते. भारतीय क्रिकेट नियमन मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या मालकीची ही कंपनी आहे. एन. श्रीनिवासन हेच इंडियन प्रमियर लीगमधील चेन्नईच्या संघाचे मालक आहेत. धोनी आणि श्रीनिवासन यांचे फार घनिष्ट संबंध असल्याने धोनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता.
धोनी आणि अमित शाह यांचा हस्तांदोलन करताना फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या आणि तितक्याच मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
१) हा चाहता काय म्हणतोय पाहिलं का?
२) काहीतरी विचार करुनच हस्तांदोलन केलं असेल
३) तोपर्यंत भाजपात नाही जाणार म्हणे
४) या असा गप्पा झाल्या असतील?
५) भाजपामध्ये प्रवेश करतोय की काय धोनी?
६) एक क्रिकेटचा चाणक्य तर दुसरा राजकारणातील
७) निवडणूक असो की क्रिकेट सामना आपल्या बाजूने फिरवणारे सर्वोत्तम फिनीशर
८) याचं म्हणणं अमित शाह लकी
९) १०० टक्के भाजपात जाणार
१०) झारखंड कनेक्शन
दरम्यान, आयपीएलमधील खेळाडूंची निवड करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीचा लिलाव होणार असल्याने आतापासूनच धोनीची आणि सीएसकेची सोशल मीडियावर चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर अनेकांनी धोनीचे गोडवे गात तो आता संघाचं नेतृत्व असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं असं म्हटल्याचं दिसून आलं.