Dhoni viral video: आपल्या देशामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक ‘इमोशन’ आहे. क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व तर आहेच शिवाय त्याला चाहत्यांच्या भावनांचीही एक किनार आहे. त्यामुळेच क्रिकेट स्पर्धांचा भारतात अक्षरश: सण-समारंभांप्रमाणे आनंद घेतला जातो. काही चाहते तर क्रिकेट, खेळाडू आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींसाठी इतके वेडे आहेत की त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत.आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. बंगळुरूचे चाहते विजेतेपदाची अगदी चातकासारखी वाट बघत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

RCB आयपीएल ट्रॉफी का जिंकत नाही

दरम्यान एका तरुणानं महेंद्रसिंह धोनीला आरसीबी संघाचं नेतृत्व करण्याची विनंती करतो. या चाहत्यांनं थेट एम. एस. धोनीलाच विचारलं आरसीबी का जिंकत नाही, ते आयपीएल ट्रॉफी कधी जिंकतील. यावर धोनीनं दिलेलं उत्तर ऐकून खुद्द सीएसके फॅन्स सुद्धा शॉक होतील. पाहूया व्हायरल होणारा व्हिडीओ.

एम.एस.धोनीनं सांगितलं कारण

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत एका आरसीबी चाहत्यानं धोनीसमोर आपलं दु:ख व्यक्त केलं. आयपीएल जिंकण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न विचारला. यावर धोनीनं उत्तर दिलं आहे, आरसीबी ही खूप चांगली टीम आहे. पण क्रिकेटमध्ये काही गोष्टी प्लॅनिंगनुसारच घडतील असं नाही. कारण तुमच्या समोरचाही संघ तयारीनीशी आलेला असतो. तरीही आपलं योग्य नियोजन असेल तर ते सुद्धा नक्की आयपीएल जिंकतील. तसेच हा चाहता धोनीला चक्क आरसीबी संघाचं नेतृत्व का करत नाही असंही विचारतो. यावर धोनी म्हणतो असं केलं तर माझे फॅन्स नाराज होतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: शायनिंग चांगलीच नडली! मैत्रिणी रेल्वे ट्रॅकवर सेल्फी घेत होत्या; भरधाव वेगात ट्रेन आली अन्…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओला आतापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेक RCB फॅन्सनं धोनीचे आभार मानले आहेत. शिवाय धोनीचा सल्ला RCB नं ऐकावा अशी विनंती आपल्या मॅनेजमेंटला केलीये. त्यामुळे यंदातरी आरसीबी जिंकते का हे पाहाण्यासारखं आहे. आयपीएलचा पहिला हंगाम २००८ मध्ये खेळला गेला.बंगळुरूचा संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni told why rcb does not win ipl trophy video viral on social media srk