MSEB Officer Marriage Viral Video : संसारासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत सर्वांनाच काळजी असेल असं नाही, कारण विजबील भरायची वेळ आली की, अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. कुणावर आर्थिक भार असतो, तर कुणाच्या खांद्यावर संसाराचं ओझं असतं. पण विजबील न भरल्यामुळे महावितरणाच्या खात्यावर मात्र थकबाकीचा आलेख वाढतच जातो. विजबील वेळेवर न भरल्याने विज वितरण कंपनी आणि महावितरण मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण जाणवू लागते. याच पार्श्वभूमीवर महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लग्नसोहळ्यात बायकोचं नाव हुखाण्यात घेऊन विजबिल भरण्याचंही आवाहन करणाऱ्या अभियंता अतुल पैठणकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आयुष्यभरासाठी साथ देईल तो जोडीदार खरा, शीतलचं नाव घेतो सर्वांनी वीजबील भरा आणि सहकार्य करा.”, अशा हुखाणा घेत विजबिल भरण्याचं नागरिकांना आवाहन करणाऱ्या महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांची तुफान चर्चा सुरु आहे. अतुल पैठणकर यांच्या लग्नाचा व्हिडीओ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, महावितरण कर्मचाऱ्याचे “शुभ कार्य”! नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांनी लग्नाच्या मंगल प्रसंगी उखाण्याच्या माध्यमातून केली जनजागृती! आपणही जरूर ऐका…अशाप्रकारे अतुल पैठणकर यांनी हुखाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून हजारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

नक्की वाचा – Viral News: भर लग्नसोहळ्यात नवरीसोबत घडलं भयंकर…नवऱ्याने थेट मेहुणीसोबत थाटला संसार अन्…

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “शेतकऱ्याला विजबिल प्रलंबित ठेवण्यात हौस नाही. सरकार आणि आपली यंत्रणा कारणीभूत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपास मीटर जोडले आहे, त्यांची कधीच मीटर रीडिंग होत नाही. विहिरीत पाणी असो किंवा नसो, दिवसभरात दोन तास वीज वापरतो. पण तासाला ३ ते ५ युनिट असताना तिमाही ४५० युनिट दाखवून खोटे बिल बनवलं जातं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl officer atul paithankar appeal people to pay light bill dues by saying ukhana in front of bride video clip viral on twitter nss