Viral Video : सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात महिला सुरक्षिततेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचार, बलात्काराच्या प्रकरणांवरून संपूर्ण महाराष्ट्रसह देश हादरलाय. आपल्या मुलीने सुरक्षित रहावे अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. आपली मुलगी शाळा, कॉलेजमध्ये किंवा नोकरीवर जाताना सुरक्षित जावी आणि सुरक्षित घरी परत यावी,असे प्रत्येक पालकांना वाटते. अनेकदा प्रवास करताना लहान मुलींना, तरुणींना किंवा महिलांना वाईट अनुभव येतात. अनेकदा बस, रेल्वे, लोकल, ऑटोमधून प्रवास करताना सुरक्षित वाटत नाही. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास!

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एसटी बस मधून एकटी प्रवास करताना एक शाळकरी मुलगी दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की लालपरी महिलांसाठी किती सुरक्षित आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चिमुकली शाळकरी मुलगी दिसेल. ती एसटीच्या बसनी शाळेत जाताना दिसत आहे. ती शाळेचा गणवेश घातला आहे. तिच्याजवळ शाळेची बॅग सुद्धा आहे.
या बसमध्ये बस ड्रायव्हर आणि कंडक्टर याशिवाय कोणीही नाही. मुलगी एकटीने बसचा प्रवास करताना दिसत आहे. ही बस विदर्भातील आहे. काटोल तालुक्यातील ही बस आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल की एसटीचा प्रवास हा किती सुरक्षित असतो. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लिहिलेय, ” एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास.”

हेही वाचा : दिसला माणूस की तोड लचका! लांडग्यांमुळे ३५ गावं भयभीत; आठ जणांचा घेतला बळी; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

Best Of Devendra Fadnavis या युट्युब अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” आत्ताच्या गढूळ झालेल्या वातावरणात लालपरीच्या कुशीत सुखरूप असलेली लेक मनाला आनंद देणारी आहे.”

हेही वाचा : आई ही आई असते! बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले अन् मदतीसाठी आई करतेय लोकांजवळ विनवणी, Video Viral

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडिओ आवडला असून त्यांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींच्या अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर या विरोधात आंदोलन उभे राहिले. पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे की नाही, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर सध्या व्हायरल होत असलेला एसटी महामंडळाच्या बसमध्ये सुखरूप प्रवास करणाऱ्या चिमुकलीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.