Viral Video : सोशल मीडियावर बस आणि बसचालकाचे अनेक व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये बसच्या आत बोनेटवर असे काही लिहिलेय की कुणी त्या बोनेटला धक्का सुद्धा मारणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की चालकाने बोनेट बॉक्सवर लिहिले तरी काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ बसच्या आतील भागातील आहे. या व्हिडीओमध्ये चालक बस चालवत आहे. बसमध्ये प्रवासी सुद्धा बसलेले दिसल आहे. अनेकदा बसमध्ये खूप गर्दी असते तेव्हा काही प्रवासी ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या बोनेटवर बसतात किंवा त्यावर उभे राहतात. त्यामुळे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ड्रायव्हरने बोनेटवर लिहिलेय, “लक्ष्मीला पाय लावू नये” या व्हिडीओवर लिहिलेय, “ज्या कामातून घर चालते, ते प्रत्येक काम मंदिराप्रमाणे पवित्र असते. ड्रायव्हरचं गाडीवर असलेलं प्रेम” ( MSRTC bus Video St driver wrote on bus bonnet or bus engine hood do not touch your leg on Lakshmi video goes viral on social media)
पाहा व्हायरल व्हिडीओ
बोनेट हे बसच्या इंजिनच्या डब्यावर बसवलेले कवच असते. एका चालकासाठी बोनेट हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे चालकाने या बोनेटला लक्ष्मी संबोधले आहे.
socialkatta91 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काम हीच पूजा आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जी व्यक्ती ही गाडी चालवत असेल त्यांना माझ्याकडून…” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्याची बस आहे हिंजवडी ते पुणे”आणखी एका युजरने लिहिलेय, “जसं आपल हृदय असत असच हे लक्ष्मीचं हृदय आहे…कोणीही यावर पाय ठेवू नये अथवा बसू नये…” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.