Viral Video : सोशल मीडियावर बसमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी बसमध्ये गाणी गाताना दिसतात तर कधी कोणी बसमध्ये डान्स करताना दिसतात. कधी सीटवरून दोन प्रवाशांमध्ये वाद पेटतो तर कधी सुट्ट्या पैशांवरून प्रवासी कंडक्टर एकमेकांबरोबर भांडताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला प्रवासीने तिकीट न काढल्यामुळे कंडक्टर तिला जाब विचारताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका चालत्या एसटी बसमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तिकीट न काढल्यामुळे कंडक्टर एका महिला प्रवासीला जाब विचारत आहे.

कंडक्टर – कोणते गाव आहे हे?
महिला प्रवासी – काचेवानी
कंडक्टर – का तिकीट घेतली नाही आतापर्यंत?
महिला प्रवासी – मी फोनवर बोलत होती म्हणून तिकीट काढली नाही.
कंडक्टर – तुम्ही कुठून बसलात?
महिला प्रवासी – मी तिरोड्यावरून बसले.
कंडक्टर – पूर्वीची तिकीट कुठे आहे?
महिला प्रवासी तिकीट दाखवते.
कंडक्टर – कुठली तिकीट आहे?
महिला प्रवासी – तुमसर – तिरोडा
कंडक्टर – मग तिरोड्यावरून तिकीट का घेतली नाही तुम्ही?
महिला प्रवासी – मला फोन आला होता. मी फोनवर बोलत होती म्हणून मी विसरली. माझ्या हातात पैसे होते. मी गोंदियाला जात आहे.
कंडक्टर – तुमचे तिकीट संपले तिरोड्याला तर तुम्ही तिकिट का नाही घेतले?
महिला प्रवासी – तुम्ही बाहेर गेला होता.
कंडक्टर बसमधील इतर महिलांना विचारतो की तुम्ही तिरोड्यावरून तिकीट घेतली का? त्यावर त्या सर्व महिला ‘हो’म्हणतात.
कंडक्टर – मग यांनी का घेतली नाही?
महिला प्रवासी – मी फोनवर बोलत होते.
कंडक्टर – कोणाची जबाबदारी आहे तिकीट घेणे
महिला प्रवासी – माझी जबाबदारी आहे.
कंडक्टर – आता जर तिकीट चेकर आले असते तर? किती किमी आली गाडी? दोन स्टॉप गेले.
कोण जबाबदार आहे?
महिला प्रवासी – मी जबाबदार आहे.
कंडक्टर – तुम्ही आता दंड भरा
महिला प्रवासी – मी दंड भरणार नाही.

हेही वाचा : Kedarnath : हवेत घिरट्या घातल्या, हेलकावे खाल्ले अन् वायर तुटताच क्षणात…; पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO

हा व्हिडीओ विदर्भातील असून तुमसरवरून ही महिला गोंदियाला जात होती. एसटी बसमधील हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.facebook.com/reel/1208715540464807

एका फेसबूक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “ताईंनी तिकीट काढायला पाहिजे का? या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कंडक्टर तुम्ही का नाही तिकीट काढण्यासाठी गेले. तुमची पण जबाबदारी आहे तिकीट काढले की नाही विचारायची? आमच्या कडे बसमध्ये तिकीट घेतली की नाही हे विचारत असतात कंडक्टर पण ती विसरली तर तुमची जबाबदारी आहे तिकीट घेतली की नाही विचारायचं.” तर एका युजरने लिहिलेय, “लाडकी बहीण फायदा घेत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ह्या बाइच्या चुकीमुळे कंडक्टर ची नोकरी जाऊ शकते. रोड वर जर महामंडळ चेकरनी गाडी चेक केली तर दोषी वाहकाला समजल्या जाते.”