MTV ad goes viral for Republic Day: ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, MTV ने एक विचारप्रवर्तक जाहिरात प्रकाशित केली, ज्यामध्ये तरुण भारताला “महत्वाच्या प्रश्नांपासून विचलित होण्यास थांबवण्याची” विनंती केली. जाहिरातेत एक लहान मुलगा उत्सुक होऊन भारताच्या “महानतेविषयी” आईला प्रश्न विचारत असतो पण त्या प्रश्नांना त्याची आई दुर्लक्ष करत आहे, असे दाखवले आहे.
या जाहिरातीची सुरूवात एक लहान मुलगा आणि त्याची आई एकत्र सोफ्यावर बसून बोलत असतात अशी होते. ते दोघं बोलत असताना मुलगा आईला भारताच्या आव्हानांबद्दल काही कठीण प्रश्न विचारायला सुरुवात करतो. तो विचारतो, “मम्मी जर भारत सर्वात चांगला देश आहे, तर तुम्ही ताईला अमेरिकेत का पाठवताय?” यावर त्याची आई काहीच उत्तर देत नाही. नंतर तो विचारतो, “भारत जर इतका सुंदर आहे तर, आपण नेहमी फिरायला परदेशातच का जातो?” आणि यावरही त्याची आई या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते.
वर्तमानपत्रकडे नजर टाकत तो आईला पुन्हा एकदा विचारतो की, “मम्मी जर जगातील सर्वोत्तम अभियंते आपल्याकडे आहेत तर भारतात एवढे वाईट रस्ते का आहेत?” याचंही उत्तर न देता, आई वर्तमानपत्र दोन तुकड्यात फाडून टाकते, आणि त्याचं विमान बनवून हवेत उडवून टाकते.
यामुळे खरंतर मुलाची उत्सुकता वाढत जाते, आणि तो प्रश्नांवर प्रश्न विचारतो. तो कपाटात लपवलेल्या पैशांबद्दल विचारतो आणि म्हणतो, “मम्मी कपाटात इतके सगळे पैसे का ठेवले आहेत.” नंतर ” बाबांनी पोलिसांना पैसे ‘थॅंक्यू’ म्हणून दिले होते?” असंही तो विचारतो, “आपल्या घरातली मदतनीस वेगळ्या ग्लासमधून का पाणी पिते ?” तसंच “कांदे एवढे महाग का आहेत?” असे अनेक प्रश्न तो आईला विचारतो.
यानंतर जेव्हा तो बॉलीवुडविषयी, विशेषतः सैफ अली खानचा मुलगा तैमूरबद्दल विचारतो, आणि तेव्हा त्याची खुश होते त्याला अगदी हसत उत्तर देते. “महत्त्वाचे प्रश्न विचारत राहा.” या संदेशासह जाहीरात संपते.
या जाहिरातीचा व्हिडीओ X वर शेअर करत, प्रशांत भूषण, लेखक आणि सुप्रीम कोर्टाचे वकील, यांनी लिहिले, “आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी MTV ची काय भन्नाट जाहीरात आहे!”
अनेक सोशल मिडिया वापरकर्त्यांनीप्रजासत्ताक दिनावर जनजागृती करण्यासाठी MTV चं कौतुक केलं. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “जेव्हा तुम्ही तुमच्या देश चालवणाऱ्यांना प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही तुमचं एक कर्तव्य बजावता,” असं एका युजरने कमेंट करत लिहिलं. “खूपच शानदार आणि खूप माहितीपूर्ण,” अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. “जाहीरातेत विचारलेले प्रत्येक प्रश्न (शेवटच्या प्रश्नाशिवाय) राजकारणी देशात मोठे बदल करण्यासाठी वापरू शकतात. प्रश्न विचारत राहा,” अशी प्रतिक्रिया तिसऱ्या युजरने दिली.