भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, अनंत व राधिका यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमांची पत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत अनंत व राधिका यांच्या लग्नाअगोदर कोणकोणते कार्यक्रम पार पडणार आहेत याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर येथे अनंत व राधिकाचे लग्नाअगोदरचे कार्यक्रम पार पडणार आहेत. १ मार्च २०२४ पासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून ३ मार्च २०२४ पर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत.
अनंत व राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रम पत्रिकेची थीमही खूप आकर्षक आहे. जंगल थीमवर आधारित असणारी ही पत्रिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पत्रिकेबरोबरच मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी लिहिलेले एक भावनिक पत्रही जोडण्यात आले आहे. मात्र, या पत्रिकेत दोघांच्या लग्नाच्या तारखेचा समावेश करण्यात आलेला नाही.
हेही वाचा- रतन टाटांनी भारतीय लष्कराला बुलेट प्रूफ बसेस दिल्यात का? व्हायरल पोस्टमागील दाव्याचं सत्य जाणून घ्या
गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये अनंत व राधिकाचा साखरपुडा सोहळा पार पडला. अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी या साखरपुड्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही लहानपणापासूनचे मित्र-मैत्रीण असल्याचे सांगण्यात येते. अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमात राधिकाचा सहभाग असतो.
कोण आहे राधिका मर्चंट
राधिका ही भारतातील प्रसिद्ध उद्योगपती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाने डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून आपले पुढचे शिक्षण घेतले आहे. राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून राजकारण आणि अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. अभ्यासाबरोबर तिला डान्सचीही आवड आहे.