Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी उत्तराखंड येथील दोन प्रमुख तीर्थस्थळांना मुकेश अंबानी यांनी भेट दिली. बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामच्या दर्शनासाठी अंबानी गेले होते. या धार्मिक यात्रेदरम्यान त्यांनी दोन्ही धामांना भरभरुन दानं दिलं. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आगमनामुळे कडेकोट बंदोबस्त होता. यावेळी त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. दरम्यान यावेळी मुकेश अंबानींच्या दानशूरतेची चर्चा रंगली.

अंबानी कुटुंबीयांनी आज बद्रीनाथ आणि केदारनाथचे दर्शन घेतले. यानंतर मुकेश अंबानी यांनी मंदिर समितीला नैवेद्यासाठी ५ कोटी रुपये दिले. भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून १२ ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रेची सुरुवात होते. मुकेश अंबानी यांनी श्री बद्रीनाथ धाम येथून आपल्या धाम यात्रेला सुरुवात केली. ते आज सकाळी श्री बद्रीनाथ मंदिरात पोहोचले. तेथे मंदिरातील पुजारी आणि भक्तांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले.

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव

बद्रीनाथ-केदारनाथ धामसाठी मुकेश अंबानींनी उघडला पेठारा

केदरनाथ देशभरातून लोक दर्शनासाठी येतात. केदारनाथ येथे दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येतात. उत्तराखंडमधील चार धाम यात्रा ही एक लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. त्यात हिमालयातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र स्थळांच्या समाविष्ट आहे.केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.

गेल्यावर्षीही दिलं होतं दान

मुकेश अंबानी यांनी गेल्यावर्षीही देवस्थानांना भेट दिली होती. २०२३ मध्ये त्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत पवित्र तीर्थस्थानांना भेट दिली होती. तर २०२२ मध्ये, अंबानी कुटुंब आशीर्वाद घेण्यासाठी बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धाम येथे पोहोचले आणि मंदिरांच्या संयुक्त समितीला ५ कोटी दान केले होते. मंदिरांना वारंवार भेट देण्यासाठी आणि देवस्थानांना देणगी देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबानी कुटुंबाने यापूर्वी गणेश चतुर्थीसाठी मुंबईतील लालबागचा राजाच्या मूर्तीला अंदाजे १५ कोटी रुपयांचा २० किलोचा सोन्याचा मुकुट दान केला आहे.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/ANI/status/1847887481779474891

हेही वाचा >> “ऐ तुझी नोकरी खाऊन टाकेन” कंडक्टरबरोबर भांडताना महिलेनं ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?

केदरनाथ देशभरातून लोक दर्शनासाठी येतात. केदारनाथ येथे दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराची पूजा करण्यासाठी येतात. उत्तराखंडमधील चार धाम यात्रा ही एक लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आहे. त्यात हिमालयातील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चार पवित्र स्थळांच्या समाविष्ट आहे.केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.