जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी व नीता अंबानींची मुलगी ईशा नुकतीच आई झाली. १९ नोव्हेंबरला ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर पती आनंद परिमल यांच्याबरोबर ईशा पहिल्यांदाच मायदेशी परतली आहे. नातू व नातीला पाहून आजी-आजोबा झालेल्या मुकेश अंबानी व नीता अंबानींचा आनंद गगनात मावेनासा झाला.

अंबानी कुटुंबियांकडून नव्या पाहुण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईतील अंबानी कुटुंबियांचं निवासस्थान असलेल्या ‘अँटेलिया’ बंगलाही सजविण्यात आला. ईशा अंबानीचं स्वागत करण्यासाठी मुकेश अंबानी व नीता यांच्यासह तिचा भाऊ आकाश अंबानी विमानतळावर पोहोचला होता. यादरम्यान ईशा अंबानीच्या मुलांची झलक पाहायला मिळाली.

Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

हेही वाचा>>“मी कार्यक्रम बंद करणार नाही कारण…”, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

नीता अंबानी व नातवंडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी नातवंडाला हातात घेऊन खेळवताना दिसत आहेत. नातवंडाला पाहताच नीता अंबानींच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी ड्रायव्हरच्या सीटवर बसताना दिसत आहेत. मानव मंगलानी या पापाराझी अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांना कमेंट करत अंबानी कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> …म्हणून आज अंबानी दान करणार ३०० किलो सोनं! मुंबईत विशेष कार्यक्रमाचंही करण्यात आलं आयोजन

हेही वाचा>> “तेच, असे किती आले आणि गेले…”, मानसी नाईकच्या पोस्टने वेधलं लक्ष

ईशाने मुलाचे नाव कृष्णा तर मुलीचे नाव आदिया असं ठेवलं आहे. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, देशभरातील मोठ्या मंदिरांमधील मान्यवर पुजाऱ्यांना आज इशा आणि आनंद परिमल यांच्या वरळीमधील घरी या जुळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. ‘करुणा सिंधू’ या निवासस्थानी धार्मिक सोहळा पार पडणार आहे. अंबानी या निमित्ताने ३०० किलो सोनं दान करणार आहेत. 

Story img Loader