मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एक ४७ वर्षीय महिला सायबर फसवणुकीला बळी पडली आहे. संबंधित महिला स्थानिक वाईन शॉपमधून २,००० रुपयांची वाइन ऑनलाइन खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान तिला ३.८० लाख रुपये गमवावे लागले आहेत. वांद्रे पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी एफआयआर नोंदवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबरला कार्टर रोडजवळ राहणाऱ्या एका महिलेने गुगलवरून वांद्रे येथील एका वाईन आउटलेटचा नंबर घेतला आणि त्यावर कॉल केला. गुन्हेगारांनी त्या महिलेला वाईन शॉपमधील कर्मचारी अशी ओळख पटवून देऊन तिच्याकडून बँकेशी संबंधित माहिती काढून घेतली. यानंतर काही क्षणातच तिच्या बँक खात्यातून ३.८० लाख रुपये चोरीला गेले.

red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sanjay Raut
Ladki Bahin Yojana : “१५०० रुपयांच्या बदल्यात बहि‍णींच्या घरात दारूडे…”; लाडकी बहीण योजनेवरून राऊतांची अजित पवारांवर टीका
Transfer of Rs 1500 aid under Ladki Bahin scheme resumes in Maharashtra
Ladki Bahin scheme : ६७ लाख ‘लाडक्या बहिणीं’ च्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा
SEBI found Bharat Global Developers Limited guilty of serious fraud
वर्षभरात शेअरचा भाव १६ रुपयांवरून १,७०२ रुपयांवर; कुशंकेतून ‘सेबी’कडून या कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी 
Worlds most expensive human tooth
जगातील सर्वात महागडा दात कोणाचा आहे माहित्येय का? एका दाताची किंमत आहे….
Woman in Andhra orders appliances and receives dead body with a letter demanding1 crore 3 lakh
भयानक! महिलेने ऑनलाईन मागवलं घरगुती सामान; मात्र बॉक्स उघडताच समोर व्यक्तीचा मृतदेह अन् १.३ कोटींचे खंडणी पत्र
vodka Indians loksatta news
जल्लोष करण्यासाठी ४१ टक्के भारतीयांची ‘शॅम्पेन’ला पसंती, भारतात ‘व्होडका’ भेट देण्याचे प्रमाण ५० टक्के

ही महिला एका कंपनीच्या व्यवस्थापन विभागात कार्यरत आहे. तिने पोलिसांना सांगितले की ६ सप्टेंबरला संध्याकाळी तिला आणि तिच्या मित्राला मद्यपान करायचे होते. त्यामुळे तिने वांद्रे पश्चिम येथील चिंबई रोडवरील पिंकी वाईन्सचा नंबर गुगलवर शोधून त्यावर कॉल केला. यावेळी तिने दोन हजारांच्या दारूची ऑर्डर दिली. तथापि, अनेक सायबर गुन्हेगार त्यांचे मोबाईल नंबर वाईन शॉप्स, रेस्टॉरंट्स, केक शॉप्स, कुरिअर सेवा, बँक हेल्पलाइन नंबर, ऑनलाइन शॉपिंग पोर्टलचे कस्टमर केअर नंबर इत्यादींच्या नावाने गुगलवर देतात याची तिला माहिती नव्हती.

Photos : iPhone 14 लाँच होताच iPhone 13च्या किंमतीमध्ये मोठी घट! किंमत वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेने तिच्या क्रेडिट कार्डचे तपशील आणि तिच्या फोनवर आलेले ओटीपी फसवणूक करणार्‍याला बिल तयार करण्यासाठी शेअर केले आणि काही सेकंदात तिच्या दोन क्रेडिट कार्डवरून सात व्यवहारांमध्ये एकूण ३.८० लाख रुपये डेबिट झाले. त्यानंतर महिलेने पुन्हा त्या नंबरवर कॉल केला मात्र त्या व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केले.

दरम्यान, या व्यक्तीवर आयपीसीच्या कलम ४१९ आणि ४२० अंतर्गत फसवणूक आणि तोतयागिरी केल्याबद्दल आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ सी आणि ६६ डी अंतर्गत ओळख चोरी आणि फसवणूक करण्यासाठी संगणक संसाधने वापरल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Story img Loader