Mumbai AC Local Fight Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. अशातच लोकलमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत. त्यात महिलांचा डब्बा म्हटलं की ही भांडणं काही साधीसुधी नसतात. महिलांची काही भांडणं हाणामारीपर्यंतदेखील येऊन पोहोचतात.
सोशल मीडियावर अनेकदा अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, तुम्ही कधी मुंबईच्या लोकलच्या एसी ट्रेनमधलं भांडण पाहिलयंत का? आता मुंबई लोकल नंतर एसी ट्रेनमध्येदेखील महिलांमध्ये वाद झाला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई एसी लोकलमध्ये एक तरुणी जोरजोरात एका महिलेशी भांडताना दिसतेय. सीटवर बसलेल्या महिलेचा आणि तिथेच शेजारी उभ्या असलेल्या तरुणीचा हा वाद पाय लागल्याने झाला असं दिसतंय.
हे भांडण इतक्या टोकाला जातं की या वादाचं रुपांतर मारामारीत होतं. दोघी एकमेकांना हाताने मारू लागतात. जोरजोरात भांडणारी तरुणी आपल्या मर्यादा ओलांडते आणि शिवीगाळ करू लागते. या भांडणात मध्यस्ती करत दुसरी एक महिला तरुणीला ओरडायला जाते तर ती तरुणी तिलाही शिवीगाळ करते.
हा व्हिडीओ @japinder0075 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “ये तो कही भी झगडा कर सकती है” (ही कुठेही भांडू शकते) असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.
दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील भांडणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्याचा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तसंच नेटकऱ्यांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.