अस्सल साऊथ इंडियन असलेला पदार्थ म्हणजे डोसा. झटपट आणि पोट भरणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. त्यामुळे मुंबईतच काय परदेशातही हा पदार्थ आता फेमस होतोय. अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावरही बरेच जण मसाला डोसा किंवा त्याचे विविध प्रकार ऑर्डर करतात. त्यामुळे त्याला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते. अगदी १०० ते जास्तीत जास्त १५० रुपयांपर्यंत मिळणारा हा डोसा मुंबई विमानतळावर तब्बल ६०० रुपयांना विकला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात डोशाची रेट लिस्टही दाखवण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक शेफ डोसा बनवताना दिसत आहे. त्याचदरम्यान व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने त्या शॉपमधील डोश्याची रेट लिस्ट दाखवली, जी पाहिल्यानंतर युजर्सही चक्रावले. या व्हिडीओत दाखवलेल्या रेट लिस्टमध्ये एका मसाला डोसाची किंमत ६०० रुपये आहे, तर साधा डोसा ६२० आहे. जर एखाद्या ग्राहकाला डोश्याबरोबर लस्सी किंवा फिल्टर कॉफी प्यायची असेल तर खर्च आणखी वाढतो.
हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर शेफ डॉन इंडिया या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुंबई विमानतळावर डोश्यासमोर सोनं स्वस्त आहे. या व्हिडीओवर लोकांच्या सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. यात अनेक जण मुंबई विमानतळावर खाद्यपदार्थांच्या किमतींसंदर्भात भाष्य करत आहेत.
या व्हिडीओवर लोकांनी केल्या अशा कमेंट
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘एक दिवस किडनी विकावी लागेल.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘कोणी सांगू शकेल का, एअरपोर्टवर खाद्यपदार्थ इतके महाग का आहे?, तर तिसऱ्या युजरने मजेशीरपणे लिहिले की, ‘साऊथमधील लोक काय विचार करत असतील?’