Mumbai Auto Rickshaw: प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेट वॅन गॉगला केवळ ३६ वर्षांचे आयुष्य लाभले होते. पण, कमी कालावधीत त्याने आपले नाव सगळ्यांच्या मनात कोरले होते. त्याची स्वतःच्याच कानाचा तुकडा कापून देण्याची कृती, बंदुकीच्या गोळीने केलेली आत्महत्या आणि त्याची चित्रे यांची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. तीव्र रंग, दाट रंगलेपन व नाइफ पॅलेट यांचा वापर केल्याने वॅन गॉगची चित्रे लगेचच लक्षात यायची. आज असेच काहीतरी सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या एका रिक्षाचालकाने स्वतःची रिक्षा हुबेहूब वॅन गॉग यांच्या द स्टारी नाईट या चित्राप्रमाणे रंगवली आहे.

व्हायरल पोस्ट ठाण्याची आहे. ठाण्यातल्या एका रिक्षाचालकाची अनोखी रिक्षा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सहसा मुंबईतल्या रिक्षा या काळ्या व पिवळ्या रंगाच्या असतात. पण, काही रिक्षाचालक त्यांच्या आवडीनुसार रिक्षाच्या आतमध्ये फुलझाडे, पंखा आदी सजावटीद्वारे प्रवाशांचा प्रवास सोईस्कर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, या रिक्षाचालकाने स्वतःची रिक्षा प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ चित्रासारखी रंगवली आहे. एकदा पाहाच रिक्षाचालकाची ही अनोखी कलाकारी.

Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: आर्यन मिश्राला गोरक्षकांनी गोळ्या झाडून मारलं; वडील म्हणाले, “आम्ही पंडित आहोत…”
ganesh idols made from paper
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
rickshaw driver beaten, rickshaw Thakurli,
Dombivli : भोंगा वाजविल्याच्या रागातून ठाकुर्लीत रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड मारला

हेही वाचा…पाठलाग केला, लाथ मारली अन्… दुचाकीस्वारांचा अज्ञात गाडीचालकाला त्रास देतानाचा VIDEO VIRAL; नेटकरी म्हणाले, ‘असे बदमाश…’

पोस्ट नक्की बघा…

रिक्षाला दिलं नवं रूप:

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, नाईट पॅलेटचा वापर करून, निळ्या, पिवळ्या रंगानी वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ या चित्रासारखी थीम चालकाने आपल्या रिक्षावर रेखाटली आहे; जी अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. या चित्रामुळे तीनचाकी (थ्री व्हीलरला) रिक्षाला एक अनोखे रूप आले आहे. रिक्षावरील नंबर प्लेट ठाणे-आधारित नंबर प्लेट (MH 04) होती आणि ती मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवर फिरताना दिसली. यादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने या रिक्षाचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

सोशल मीडियावर ही पोस्ट २५ जुलै रोजी या @andheriwestshitposting इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे; ज्याला नऊ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. रिक्षा चालकाच्या या अनोख्या कलाकृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत; तर काही युजर्सना थक्क करून सोडले आहे. त्यांनी या रिक्षाला आतापर्यंत पाहिलेली सगळ्यात छान रिक्षा, असे म्हटले आहे. तसेच अनेक युजर्स कमेंट्समध्ये रिक्षाचालकाच्या कल्पकतेचे आणि त्याने रेखाटलेल्या या प्रसिद्ध चित्राचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसून आले आहेत.