Bhayandar viral video: पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते. पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे अनेकदा पाय अडकल्याने अनेक जण पडतात. लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आजही देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे चांगले रस्ते तयार केलेले नाहीत. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरतं काम केलं जातं, पण काही दिवसांमध्येच रस्त्याची दुरावस्था होते. याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने खड्डे शोधणे अवघड होऊन बसते, त्यामुळे काही वेळा मोठे अपघातही होतात. अशीच एक धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस होता, या पावसात ठिकठिकाणी पाणी भरलं होतं. असंच पाणी भाईंदर परिसरातही भरलं होतं, याच पाण्यातील एका खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यावेळी या मुलाच्या आईचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

नेमकं काय घडलं वाचा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामध्ये आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आई आणि घरातले इतर लोक बाहेर आले आहेत. यावेळी मुलाचा शोध घेताना एका व्यक्तीला हा मुलगा पाण्यानं भरलेल्या एका खड्ड्यात पडलेला दिसतो. यावेळी त्या खड्ड्यातून या मुलाला बाहेर काढण्यात येते, मात्र पाणी नाका-तोंडात जाऊन या मुलाचा मृत्यू झालेला होता. यावेळी त्याच्या आईने एकच टाहो फोडल्याचं दिसत आहे. पुढे ही व्यक्ती मुलाला आईच्या हातात देताना दिसत आहे, तर आई मुलाला एका दगडावर ठेऊन उठवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C9ryHhzSV0l/?utm_source=ig_web_copy_link

हेही वाचा >> VIDEO: मृत्यूच्या दारात जाऊन परतली तरुणी; १३ व्या मजल्यावरुन खाली पडली अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

हा व्हिडीओ chalo_dombivli नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सावधान भाईंदरमध्ये पावसाचे पाणी खडडयात जमल्याने लहान मुलांचा जिव गेला आहे. तरी तुम्ही सावध राहा, कारण खूप पाऊस पडत आहे, रस्त्यावर पाणी जमलं आहे, खूप खड्डे झाले आहेत, त्यामुळे तुम्ही सावध रहा.” असं कॅप्शन दिलं आहे. तर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.