Viral Video: उन्हाळा ऋतू आला की, बरेच जण थंडगार ठिकाणी म्हणजेच शिमला, तर रिसॉर्ट, व्हिला आदी विविध ठिकाणांना भेट देतात तर काही जण घरीच पूल पार्टी करतात. पण, तुम्ही कधी माकडांना पूल पार्टी करताना पाहिलं आहे का? नाही… तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; ज्यात उन्हामुळे हैराण माकडं स्विमिंग पूलमध्ये मनोसोक्त आनंद घेताना दिसत आहेत ; जे पाहून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल.
व्हायरल व्हिडीओ मुंबईतील बोरिवली येथील आहे. एका निवासी परिसरात दोन स्विमिंग पूल होते. तर या स्विमिंग पूलमध्ये मासे किंवा माणसं नाही. तर चक्क सहा ते सात माकडांचा समूह मजेत वेळ घालवताना दिसला आहे. माकडं चक्क स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्यात विसावणारा माकडांचा हा समूह तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…VIDEO: पठ्ठ्याने फ्रिज, कूलरच्या मदतीने केला देशी जुगाड; थंडगार हवेसाठी आता AC लाही जाल विसरून
व्हिडीओ नक्की बघा…
दोनपैकी एका स्विमिंग पूलमध्ये तीन माकडे आनंदाने पोहत दिसताना आहेत, तर त्यातील काही माकडं स्वतःला कोरडे करून घेण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी बाजूच्या हँडलला धरून बसले आहेत. तर एक माकडं पाण्यात उडी घेताना दिसत आहे. पण, माकडांचा स्विमिंग पूलमध्ये पोहतानाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल व माशांची जागा माकडानं घेतली असं आपसूकच तुमच्या तोंडून निघेल.
उन्हाळ्यात माणसांना जशी पाण्याची गरज असते तशीच प्राण्यांनादेखील असते.पुरेसे पाणी मिळाल्याने पाळीव प्राणी निरोगी, हायड्रेटेड व आनंदी राहतात. असंच आजच्या व्हायरल व्हिडीओत पहायला मिळालं आहे ; जो सोशल मीडियावर @MumbaiMarch या एक्स (ट्विटर ) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.