Bridegroome ditches car takes Metro to avoid Bengaluru traffic : लग्नासाठी वेळेत पोहोचायचं ठरवलेले असताना अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकायला होते आणि खूप चिडचिड होते, वैताग येतो. त्यात नवरदेवालाच निघायलाच उशीर झाला असेल तर उडणारी धांडल तर विचारायलाच नको. यात मुंबईत कोणत्याही ठिकाणी लवकर पोहोचायचं म्हणजे ट्रॅफिक, गर्दीचा विचार करूनच बाहेर पडावे लागते. विशेषत: मुंबईतील हल्ली अनेक लग्नसमारंभात कितीही ठरवले तरी वऱ्हाडच काय, नवरदेव-नवरीलाही हॉलमध्ये पोहोचायला उशीर होतो. यावेळी एक वाक्य हमखास कानावर पडते, ते म्हणजे किती ते ट्रॅफिक…; असाच काहीसा प्रकार एका नवरदेवाबरोबर घडला आहे.

नवरदेव कुटुंबासह लग्नाच्या हॉलवर पोहचण्यासाठी कारने निघणार असतो, पण मुंबईच्या रस्त्यावरील ट्रॅफिक इतकं जास्त होत की, त्याला वेळेत हॉलपर्यंत पोहोचता आलं नसतं. यामुळे स्वतःच्याच लग्नात मुहूर्ताआधी पोहोचावं, यासाठी या नवरदेवाने कारमधून नाही, तर चक्क मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या नवरदेवाचा वऱ्हाडाबरोबरचा मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

Wedding Muhurat 2024 : स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्…! २०२४ वर्षातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक नवरदेव लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांबरोबर मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना दिसत आहे. सर्वात आधी नवरदेवाबरोबरची करवली आणि वरमाई मुंबई मेट्रोच्या तिकीट काउंटरवरून तिकीट घेतात, त्यानंतर सर्व घाईघाईने मेट्रोत बसण्यासाठी लिफ्टजवळ पळत जातात. लग्नासाठी वेळेत पोहचणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. यावेळी नवरदेवही रॉकिंग अंदाजात पोज देतो. दरम्यान, नवरदेवाबरोबर सर्व मंडळी मेट्रोच्या डब्यात बसलेली दिसतात. यावेळी नवरदेवाने धोतर, कुर्ता, उपरणं आणि डोक्यावर मुंडावळ्या बांधून मेट्रोने प्रवास केला, तर त्याबरोबर नातेवाईक नऊवारी साड्या, दागिने असा मराठमोळा लूकमध्ये दिसल्या.

हॉलमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी कार सोडून मेट्रोने जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाने ते सर्व किती खुश आहे, हे सर्वांच्या चेहऱ्यावरचं हास्यच सांगत आहे. सुरुवातीला जेव्हा नवरदेवाच्या वेशात त्याने मेट्रोमध्ये एंट्री केली, तेव्हा इतर प्रवाशांचा थोडा गोंधळ उडाला. पण, त्याने लोकांची पर्वा न करता बिनधास्त मेट्रोमध्ये प्रवास केला आणि वेळेवर लग्नमंडपात पोहोचला असं या व्हिडीओतून समजतेय.

नवरदेवाचा मेट्रो प्रवासाचा हा व्हिडीओ @abhishhastra_by_shillparaje या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘युनिव्हर्स आणि #mumbaimetro चे आभार. माझा पुतण्या आणि आम्ही वऱ्हाडी त्याच्या लग्नासाठी वेळेवर पोहोचू शकलो… शनिवारी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर खूप ट्रॅफिक होते, त्यामुळे लग्नाचा ‘मुहूर्त’ चुकू शकला असता. पण आम्ही नवरदेव, करवली, वरमाई आणि इतर वऱ्हाडाबरोबर लग्नाचा हॉल गाठण्यासाठी मुंबई मेट्रोने जाण्याचा त्वरित आणि योग्य निर्णय घेतला.’

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून, तो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. आतापर्यंत या क्लिपला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. काही युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. मुंबईमधील ट्रॅफिकमध्ये अडकलात की तुम्ही वेळेत पोहोचू शकत नाही. बरं झालं, त्या नवरदेवाने कारऐवजी मेट्रोचा पर्याय निवडला, अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत. तर काही जण आपल्या लग्नातील अविस्मरणीय आठवणी शेअर करत आहेत.

दरम्यान, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू अशा मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर आहे, त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Story img Loader