Mumbai local accident video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे, असं म्हणायला हरकत नाही.
एका प्रवाशासाठी अख्खी लोकल रिकामी
दरम्यान, असं असताना तुम्हाला एका प्रवाशासाठी अख्खी ट्रेन रिकामी केली असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही ना.. पण, असं प्रत्यक्षात घडलं आहे. भारतातील अनेक लोक प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतात. कमी अंतर असो वा लांब, भारतीय रेल्वेचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणं सोयीचं आहे, मात्र थोडासा निष्काळजीपणाही ते तितकंच धोकादायक बनवतो. अनेकदा रेल्वेच्या धडकेनं लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातील बहुतांश अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. अनेकदा सल्ला देऊनही लोक ट्रेनमध्ये नको ती मस्ती करू लागतात आणि अपघाताला बळी पडतात.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या मध्य रेल्वेमध्ये अशीच एक घटना घडली, जिथे एका प्रवाशासाठी अख्खी ट्रेन रिकामी करावी लागली. नेमक्या कोणत्या स्थानकात ही घटना घडली हे स्पष्ट होत नाहीये मात्र या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ट्रेनवर सेंट्रल रेल्वे असं लिहलं आहे. एरवी ट्रेनमध्ये चढण्यासाठी उतरण्यासाठी भांडणारे प्रवासी एका प्रवाशासाठी चक्क ट्रेनमधून उतरले. संपूर्ण ट्रेन या प्रवाशासाठी रिकामी करावी लागली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी आहे. ही ट्रेन प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली आहे आणि यावेळी सर्व प्रवासी ट्रेनच्या खाली काहीतरी पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एक प्रवासी ट्रेनखाली पडला होता. त्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. व्हिडीओमध्ये आवाज येत आहे की, इतर प्रवासी आपल्याला सगळ्यांना ट्रेनमधून उतरायला सांगितल्याचं सांगत आहेत. शेवटी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरतानाही दिसत आहेत. रेल्वे पोलिस त्यांना ट्रेनपासून दूर होण्याच्या सूचनाही देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गृहिणींनो विकतची आलं-लसूण पेस्ट वापरता; जरा जपून…हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक प्रचंड संतापले
रेल्वेने प्रवास करताना लोकांना अनेकदा अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. हे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असतं. यामध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढण्यास आणि उतरण्यास मनाई आहे, हे लोकांना समजावून सांगितलं जातं. पण, भारतातील लोक ऐकतात कुठे? तुम्ही अनेकदा लोकांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असेल. तसंच, दरवाजात उभं राहू नका सांगूनही लोक ऐकत नाहीत.