मुंबईस्थित सौंदर्य ब्रँड एव्हॉर ब्युटीचे संस्थापक कौशल शाह यांनी अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने एक नवीन नियम लागू केला आहे. नियम सोपा होता: प्रत्येकाने सकाळी ९.३० वाजेपर्यंत ऑफिसमध्ये हजेरी लावणे बंधणकारक होते. उशीरा येणाऱ्यांना २०० रुपयांचा दंड भरावा लागतो. वक्तशीरपणा लागू करण्याची रणनीती म्हणून लागू केलेला नियम शाह यांच्यावरच उलटला. एक्सवर पोस्ट करत त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, शाह यांना स्वत: लावलेला नियम मोडल्यामुळे ५ वेळा दंड भरवा लागला. ऑफिसमध्ये उशीरा येणाऱ्यांसाठी २०० रुपये दंड आकारण्याचा नियम लावला होता पण एका आठवड्यात ते स्वत:च ५ वेळा उशीरा आल्याने त्यांनाच आठवड्याभरात जवळपास १००० रुपये दंड भरावा लागला. परिस्थितीबद्दल हताश असले तरी शहा यांनी विनोदी पद्धतीने X वर आपली कथा सांगितली. त्याने आपल्या योजनेचा अनपेक्षित परिणाम उघडपणे कबूल केला आणि पुरावा म्हणून त्याच्या २०० रुपये दंड भरतानाचा स्क्रीनशॉट शेअर केला.

हेही वाचा – गर-गर, गर-गर, गर…फिरत शक्तिमानसारखे नाचू लागले वधूचे मामा अन् काका, डान्स पाहून आवरणार नाही हसू, Video Viral

कामाच्या ठिकाणी शिस्त लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांच्या अनपेक्षित परिणामांवर प्रतिबिंबित करून शाह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “हे मी पाचव्यांदा पैसे देत आहे.”

हेही वाचा- दाढी-मिशी काढून वडिलांना सरप्राईज देणे पडले महागात! संतापलेल्या काकांनी पाहताक्षणी मुलाला धू धू धुतला, पाहा Viral Video

शाह यांची पारदर्शकता आणि त्यांनी त्यांच्या टीमसाठी जे नियम ठरवले होते त्याच नियमांचे पालन करण्याची इच्छा अनेक ऑनलाइन लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले. शेकडो वापरकर्त्यांमध्ये करमणूक आणि प्रशंसा झाली.