Viral Video : मुंबई आणि चाळ याचे अनोखे नाते आहे. शहरात अशा अनेक चाळी आहेत. काही चाळी लोकप्रियसुद्धा आहेत. मुंबईत आलेल्या अनेकांना आपल्या आयुष्याची सुरुवातील चाळीतल्या घरापासून केलेली असते. हे चाळीतले आयुष्य वेगळेच असते. तुम्हाला माहिती आहे का चाळीतले लोक कसे जीवन जगतात? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाळीतले जीवन दाखवले आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून बालपणीची आठवण येऊ शकते.
या व्हायरल व्हिडीओत एक मुलगा चाळीतल्या घराचे फोटो शेअर करत याचे वर्णन करताना दिसतो, “दहा बाय दहाची खोली. बाथटब ठेवता येईल इतकी मोरी नाही. चार माणसं राजासारखी झोपतील, इतकी मोठी खोली नाही. एक बेड, एक फ्रिज, एक टिव्हा आणि एक कपाट ठेवताच संपते ही खोली. मग पाहूणे आल्यावर पोट माळा घेतो. १ बीएचके बेडरुमची जागा… आपलं घर छोटं आहे म्हणून करुन घेत नाही मनाचा त्रागा.. सकाळी उठल्यावर संडासाची रांग लागते आणि सकाळी उठायला अलार्मची नाही तर नळावरच्या भांडणाची बांग लागते… तिथेच जन्म, तिथेच मधूचंद्र आणि तिथेच अंत्यसंस्कार.. आपल्या रक्ताचं नाही पण आपलं कोणीतरी गेलय याच शेराच्याला दु:ख फार.. आता दहा बाय दहा ची खोली गेली आता १ बीएचके असलेली घरं आली.. खोली होती दहा बाय दहा ची पण आयुष्यात जगायचं कसं, हे शिकवून गेली ती दहा बाय दहा ची खोली..”
हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काहींना चाळीतले बालपण, चाळीतले मित्र आणि शेजारी आठवतील.आता चाळीतल्या घरांची जागा फ्लॅटने घेतली पण चाळीतल्या जीवनाची मज्जाच वेगळी असते हे तितकेच खरे आहे.
हेही वाचा : बापरे! बेडकाने जिवंत साप खाल्ला, व्हिडीओ होतोय व्हायरल
aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चाळीतले दिवस” या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना चाळीतले दिवस आठवले आहेत. एका युजरने लिहिलेय, “रडवलं दादा” तर एका युजरने लिहिलेय, “छान होते ते दिवस आता फक्त आठवणी राहल्या” तर एका युजरने लिहिलेय, “चाळीतल्या जीवनाची मज्जाच वेगळी! फक्त इथेच आपुलकी आणि माणुसकी जपणारी माणसं भेटतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ते आयुष्यातील सुंदर दिवस होती