२०२५चा प्रजासत्ताक दिन आहे. आज देशभरात सर्व नागरिक हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरा करत आहेत. काही जण लोकप्रिय स्वातंत्र्य सैनिकांचे कपडे घालून येत त्यांचे स्मरण करतात तर काही जण एखाद्या मेळाव्यात भारतीय संविधानाचे मोठ्याने वाचन करून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करतात. सोशल मीडियावर सध्या एक संगीत व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणवेशधारी पोलिस देशभक्तीभर गीत बासरी वाजवून सादर करताना दिसत आहे.
मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये देशभक्ती आणि प्रतिभेचे हृदयस्पर्शी प्रदर्शन दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये आर.ए. किडवाई मार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) दादासाहेब तुकाराम खुळे हे बॉलीवूड चित्रपटाती देशभक्तीपर गाण्यावर मधुर बासरी वाजवताना दिसत आहेत.
‘राझी’ चित्रपटातील ‘ए वतन, वतन मेरे’ या गाण्यावर त्यांचे भावपूर्ण बासरी वादन सादर केले जे ऐकून नेटकरी थक्क झाल आहे. त्यांच्या कोशल्याने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे. हे गाणे मूळतः अरिजीत सिंगने ‘राजी’ या बॉलिवूड चित्रपटासाठी गायले आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.
मुंबई पोलिसांच्या बासरी वादनाने जिंकले भारतीयांचे मन
“कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापासून ते देशभक्तीचे सुर वाजवण्यापर्यंत, आर.ए. किडवाई मार्ग प.स्टेशनचे पीएसआय दादासाहेब तुकाराम खुळे यांनी या #RepublicDay ला त्यांच्या भावपूर्ण बासरीवादनाने परिपूर्ण स्वर दिला आहे”, असे कॅप्शन देत मुंबई पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.
या प्रजासत्ताक दिनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ‘ए वतन, वतन मेरे’ या गाण्यावरील मुंबई पोलिसांच्या बासरी वादन ऐकून भारतीयांची मने जिंकली आहेत. खुळेंच्या बासरी वादनाने लोकांना प्रभावित केले आणि जे ऐकून भारतीयांच्या मनात राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली.
प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स देऊन या त्यांच्या वादनाचे कौतुक केले. व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना काहींनी “हॅपी रिपब्लिक डे” असे लिहिले, तर काहींनी कमेंट्स विभागात ‘हार्ट’ आणि ‘टाळ्या’ असे इमोजी टाकले.
एकाने कमेंट केली,”खुप सुंदर सर, तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
दुसऱ्याने कमेंट केल्या की,”वादन ऐकून डोळ्यात पाणी आले , खूप सुंदर, अप्रतिम, जय हिंद!”