Play School Viral Video: हल्ली प्रत्येकाच्याच गरजा प्रचंड वाढल्या आहेत. कितीही पैसा आला तरी तो कमीच पडतो. हल्ली फक्त नवराच नाही तर बायकोही घरासाठी आर्थिक पाठबळ देते. तिही पुरषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. मात्र बाळ झाल्यानंतर महिला नोकरी सोडून पूर्णवेळ बाळाला देतात तर काही दुसरा पर्याय निवडतात. हा पर्याय म्हणजे पाळणा घर किंवा प्ले गृप. महिला आपल्या लहान बाळांना पाळणा घरात सोडून नोकरी करतात. मात्र आपल्या मुलाची जबाबदारी अशी एखाद्या संस्थेवर सोपवणं कितपत सुरक्षीत आहे याचा कधी विचार केला आहे का. आपण जसं आपल्या बाळाला प्रेम देऊ तसं इतर कोणी देऊ शकतं का? दरम्यान याच संदर्भात एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्ले गृपमधील एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून तुम्हीही मुलांना प्ले गृपमध्ये सोडण्याआधी दहावेळा विचार कराल.
शिक्षकांचा अमानुष चेहरा समोर –
मुले ही देवाघरची फुलेच असतात असे म्हणतात मात्र मुंबईच्या कांदिवली येथील प्री-स्कूल या शाळेत शिक्षकांचा अमानुष चेहरा समोर आला आहे. दोन ते अडीच वर्षांची मुले आपले ऐकत नाहीत, म्हणून त्यांना अमानुष शिक्षा केल्याची घटना समोर आली आहे. चिमटे काढणे, हाताला मिळेल त्याने मारहाण, मुलांना उचलून आपटणे अशी क्रूर वागणूक या दोन शिक्षिकांनी मुलांना दिली आहे. चिमुकल्यांचा हा अमानुष छळ प्लेग्रुपमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: एका क्षणात होत्याचं नव्हत झालं! तरुणानं सिगारेट पेटवली अन्
या मुलांना शिकवण्याची जबाबदारी संस्थाचालकांनी दोन शिक्षिकांना दिली असून, त्यांच्या मदतीला मुलांना सांभाळण्यासाठी दोन मदतनीस महिलाही आहेत. दोन ते अडीच वर्षांच्या मुलांच्या वागणुकीत अचानक बदल जाणवू लागल्याने पालकांनी संस्थाचालकांची भेट घेतली. त्यांच्याकडे मुलांना नीट शिकवले जात नाही, अशी तक्रार केली. संस्थाचालकांनी पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन, त्यांनी याबाबत शिक्षिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता १ मार्चपासून २७ मार्चपर्यंतच्या कालावधीतील प्लेग्रुपमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन्ही शिक्षिका मुलांना देत असलेली क्रूर वागणूक पाहून त्यांना धक्काच बसला.