Viral video: आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. चोर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरुन चोरीच्या संधी शोधून काढतात.चोर आजकाल असे सुसाट चोऱ्या करतात की आपण कधी रिकामे होतो कळतच नाही. बस, ट्रेन अगदी रस्त्यानं चालतानाही हे चोर कधी हात साफ करुन जातील याचा नेम नाही. यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी प्रवाशांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चोरीच्या अनेक घटना दररोज आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. अनेकदा चोरटे गर्दीच्या ठिकाणीही हातचालाखीने चोरी करून पसार होतात. याच चोरांपासून सावध राहण्यासाठी आणि आपलं नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी बसमध्ये सर्व प्रवाशांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस सांगत आहेत की, जेव्हा तुम्ही बसमध्ये चढता तेव्हा तुम्हाला तुमच्याजवळ असलेली बॅग किंवा सामान पुढे घ्यायचं आहे. विशेषत: तुमचा मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

दररोज जे बसने प्रवास करतात, तुमचे मित्र, नातेवाईक या सगळ्यांना खबरदारी घ्यायला सांगा. संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हाच हे चोरटे गर्दीचा फायदा घेत चोरी करतात. त्यामुळे तेव्हा विशेष आजूबाजूला लक्ष ठेवा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: कमाल! शेणापासून तयार केली वीज, फॅनसह विविध वस्तू चार्जिंग करण्यासाठी तरुणाचा जुगाड

रोज कितीतरी चोरीच्या घटना घडत असतात. काहीवेळा चोर रंगेहात पकडलेही जातात. मात्र, तरीही याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घेणे आवश्यक आहे. हा व्हिडीओ स्वत: पोलीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai crime news while boarding the bus take care of mobile and purse police announcement video viral srk