Mumbai dadar station video: मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वांत कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे ही गर्दी वाढत आहे. मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यात दादरची गर्दी पाहून तर नव्या प्रवाशाला धडकीच भरेल; मात्र रोजच्या प्रवाशांना हे काही नवीन नाही. दरम्यान, या गर्दीपासून सुटका मिळावी यासाठी अनेक जण आता एसी ट्रेनचा पर्याय निवडताना दिसतात. मात्र, दादर स्टेशनवरचा एसी ट्रेनचा हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

एसी ट्रेनमध्ये चढण्यासाठी तुफान गर्दी

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीट काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकटचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसी ट्रेनचं तिकीट सामान्य लोकलच्या तुलनेत जळपास १० पट महाग आहे. तरीसुद्धा इतकं महागडं तिकीट काढूनही मुंबईकरांना उभ्यानं लोंबकळत, हाणामाऱ्या करीत प्रवास करावा लागतोय. अन् याचीच प्रचिती देणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

एसी ट्रेनचं तिकीट काढून उपयोग काय?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डब्यात चढण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी दिसत आहे की, त्यामध्ये चेंगराचेंगरीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरीही सगळेच ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करीत असताना दिसतात. आता तुम्हीच सांगा एवढ्या गर्दीत चढायचं तरी कसं? एवढंच नाही, तर ट्रेनमध्ये असणाऱ्यांनाही या गर्दीत उतरायला मिळत नाहीये. त्यामुळे एवढं महाग तिकीट काढून उपयोग काय, असा सवाल प्रवासी करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हे फक्त पुण्यातच होऊ शकतं” विना ड्रायव्हर टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; VIDEO चा शेवट पाहून अंगावर येईल काटा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Mumbaikhabar9 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने त्यावर प्रतिक्रिया देत, “हा आजचा मुद्दा नाही, तर ही रोजची समस्या आहे. तसेच एसी लोकल वेळेवरही येत नाहीत. तिकिटे तपासण्यासाठी कधी टीसीसुद्धा येत नाहीत. त्यामुळे एसी ट्रेनबाहेर पास स्कॅनर लावला पाहिजे; जेणेकरून लोक या ट्रेनमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय चढू शकतील.” तर दुसऱ्या युजरने “प्रवाशांना याचा रोज त्रास होतो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader