रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशी अनेक कारणं अपघाला कारणीभूत ठरतात. अनेकदा अपघातून जीव वाचतो मात्र कायमचं जायबंदी व्हावं लागतं. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना वेग मर्यादा आणि नियम पाळणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक अपघात मुंबईतील दादर टीटी सर्कलजवळ झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक दुचाकीस्वार रस्त्याने जात असताना तोल गेला आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला यात त्याचा जागच्या जागीच मृत्यू झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कामासाठी बॅरिकेड लावले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यात पादचारी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची मोठी अडचण होत आहे. वाहतूक कोंडीमुळे सामन्य नागरिकांना त्रास होत असल्याचं दिसत आहे. अशातच एक दुचाकीस्वार डबल सीट डाव्या बाजूने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र अचानक समोर लावलेले बॅरिकेड्स पाहून दचकतो आणि तोल जातो. मात्र बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती येते आणि तिचा जागीच मृत्यू होतो. दुचाकी चालवत असलेली व्यक्ती उठून त्याला वाचवण्यासाठी सरसावते पण निचपीत पडलेला मृतदेह पाहण्याशिवाय काहीही करता येत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचं मन विचलित होऊ शकतं.

रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. एका चुकीमुळे जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे वाहनांचा वेग आणि नियम पाळणं गरजेचं आहे. खड्डे तसेच अडचणींच्या रस्त्यावर वाहनं चालवताना अति घाई नकोच.

Story img Loader