Lalbaugcha raja 2023 मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करत आहेत, मात्र दरवर्षी प्रमाणे मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरताना दिसत आहे. लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामध्ये भक्तांची प्रचंड चेंगराचेंगरी झाली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की लालबागच्या राजाला जाण्याआधी विचार कराल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती दिसून आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशिर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता, यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. यामध्ये महिला आणि लहान मुले देखील गर्दीत चिरडताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. विशेष म्हणजे, यावेळी मुंबई पोलीस कुठेही दिसत नाहीत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुकेश अंबानी सोशल मीडियावर झाले ट्रोल! लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ पुन्हा एकदा लालबागचा राजा येथे सुव्यवस्था राखण्यात मुंबई पोलिसांच्या अपयशावर प्रकाश टाकतो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळवण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याचे घटनेमुळे समोर आले आहे.