Son Surprised Mother With CA Result: आपल्या मुलांची प्रगती पाहून आपल्यालाही प्रचंड आनंद होतो. त्यातून जर का आपल्या मुलानं किंवा मुलीनं आपल्याला सरप्राईज केल्यावर तर पालकांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुलं घेतात तेवढीच मेहनत पालकही घेत असतात. परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते तशीच ती पालकांनाही वाटत असते. पण जेव्हा मुलं ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात तेव्हा आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वांत जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो पालकांना. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे. सीएचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात, ज्यामुळे कौतुक वाटते. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए, आनंद महिंद्रांनी घेतली दखल
मुंबईत एका भाजीविक्रेत्याच्या मुलाने सीए परीक्षेत यश मिळवून आईचे पांग फेडले आहे. या मुलाने सीए पास झाल्याच्या आनंदाची बातमी भाजी विकणाऱ्या आईला दिली. ती बातमी ऐकून त्या माऊलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिनं हातातले काम सोडून थेट मुलाला मिठी मारली आणि आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. दोघांच्या या भेटीचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याची उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही दखल घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी या मुलाचा हा व्हिडीओ शेअर करीत त्याला एक कॅप्शन दिली आहे.
“या व्हिडीओमुळे माझा दिवस खास झाला”
ठाण्यातील डोंबिवली (पूर्व) येथील एका भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा योगेश नुकताच सीएची परीक्षा उतीर्ण झाला. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ती महिला आनंद व्यक्त करतानाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करीत आनंद महिंद्रा यांनी ‘या व्हिडीओमुळे माझा दिवस खास झाला’, अशी कॅप्शन दिली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “हा चिमुकला कुणाच्या आधाराशिवाय प्रयत्न करतोय तर तुम्ही का नाही?” महिंद्रांनी शेअर केलला VIDEO विचार करायला भाग पाडेल
११ जुलै रोजी भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने सीए परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत डोंबिवली येथील एका भाजीविक्रेत्या महिलेचा मुलगा योगेश ठोंबरे याने सीए परीक्षेत उत्तीर्ण होत आई-वडिलांच्या कष्टांचे चीज केले. दोघांच्या गळाभेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तीन लाखांपेश्रा जास्त नागरिकांनी पाहिला आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी भावूक कमेंट्स पोस्ट केल्या आहेत. दोघांचेही अभिनंदन करून, माऊलीच्या कष्टांचे चीज झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.