मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून प्रत्येक महिला जात असते., पाय, कंबर पोटात दुखणं, चालण्यास त्रास होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा त्यामुळे होणारे मूड स्विंग्स अशा अनेक गोष्टींचा त्रास तिला होत असतो. असे विषय चारचौघांत सांगणंही अनेकींना सोयीचं वाटत नाही. त्यातून वर्किंग वूमनच्या बाबतीत ही समस्या तर अधिक गंभीर आहे. आपल्याला होणारा त्रास खुलेपणाने सांगता येत नाही तेव्हा मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : बर्गर खाण्याची स्पर्धा पडली महागात, तरूणाच्या पोटाला इजा

परदेशातील अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ‘पिरियड लिव्ह’ देण्याची पद्धत आता रुजत आहे. पण भारतात पिरियड लिव्ह देण्याची तशी पद्धत नाही. पण मुंबईतल्या ‘कल्चर मीडिया’ या मीडिया कंपनीने मात्र मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ती कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असेल. ही कंपनी  युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत ७५ महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचं नवं धोरण या कंपनीने सुरू केलं आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचं कंपनीनं ठरवलं आहे. ऑक्टोबर माहिन्यात ब्रिटनस्थित ‘कोएक्झिस्ट’ या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिला कर्मचा-यांना सुट्टी देण्याचं जाहीर केलं होतं. अशी सुट्टी देणारी ती ब्रिटनमधली पहिली कंपनी होती. कंपनीने या काळात महिलांना घरुन काम करण्याची मुभा देखील दिली.