Mumbai Flat Rent Viral Photo : मुंबईला ‘स्वप्नांचे शहर’ म्हटले जाते. जिथे लाखो लोक भविष्य घडवण्याच्या आशेने येतात. मनात अनेक स्वप्न घेऊन ते मुंबईत पाऊल ठेवतात, पण दुर्दैवाने मुंबई आल्यानंतर तिथे राहायचे कुठे असा प्रश्न अनेकांना सतावतो. यात मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या घरांच्या किमतींमुळे भाड्याने घरं घेणंही अनेकांसाठी अवघड होऊन बसते. त्यामुळे मुंबईत दिवस काढताना अनेकांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मुंबईत घर खरेदी करणे दूरच, भाड्याने खोली घेणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. मुंबईत भाड्याच्या घरात राहताना लाखो रुपये पगार घेणाऱ्या लोकांची परिस्थिती कठीण होऊन जाते. अशात सोशल मीडियावर सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने मुंबईत पॉश भागात टू बीएचके फ्लॅट भाड्याने घेणेही किती मुश्कील आहे सांगितले आहे. यात त्याने त्या फ्लॅटच्या भाड्याची अशी काही किंमत सांगितली आहे की, जी वाचून तुम्हालाही घाम फुटेल.

फ्लॅटमधील बाथरुम पाहून व्हाल चकित

विशेष म्हणजे त्या फ्लॅटमधील बाथरुमची रचना पाहून तो खूपच आश्चर्यचकित झाला आहे. त्यामुळे या युजरने नेमकं मुंबईतील कोणत्या पॉश भागात फ्लॅट भाड्याने घेतला आहे आणि त्या फ्लॅटतील बाथरुममध्ये त्याला असं काय वेगळं दिसलं जाणून घेऊ…

Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
The incident took place in Mumbai and an FIR to the tune was lodged on Tuesday, the Oshiwara police said on Thursday. (Representative Image)
Mumbai Crime : जुनं फर्निचर विकायला गेली मुंबईकर महिला, साडेसहा लाखांचा ऑनलाईन गंडा! नेमकं काय घडलं?
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
avadhoot gupte marathi singer buy new apartment in khar mumbai area
अवधूत गुप्तेने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर! किंमत तब्बल ‘इतके’ कोटी, १६ व्या मजल्यावर आहे फ्लॅट
salman khan shahrukh khan
सलमानपाठोपाठ शाहरूख खानलाही जीवे मारण्याची धमकी, ५० लाखांच्या खंडणीची मागणी!

मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे भाड्याच्या घराच्या किमतीही अधिक आहेत. मुंबईत अगदी लहान लहान घरांसाठी इतके भाडे आकारले जात आहे की, त्याच भाड्याच्या पैशात इतर लहान शहरांमध्ये तुम्ही एखादा बंगला भाड्याने घेऊ शकता. शहरातील अनेक फ्लॅट लहान असले तरी भरमसाठ किमतीचे टॅग लावून भाड्याने दिले जातात. त्यामुळे मुंबईबाहेर राहणाऱ्या अनेकांना कधी-कधी आश्चर्य वाटते की, एवढ्या छोट्या जागेत मुंबईची माणसं कसे काय दिवस काढतात.

हेही वाचा – मिठाईच्या दुकानातील गरमागरम समोसे आवडीने खाणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा पाहाच; पुन्हा खाताना कराल १०० वेळा विचार

अशाप्रकारे उत्कर्ष गुप्ता नावाच्या एका एक्स युजरने मुंबईतील सर्वात पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाली हिल परिसरातील 2BHK फ्लॅट भाड्याने घेतला. यावेळी फ्लॅटच्या आतील बाथरुममधील डिझाईन पाहून त्यालाही धक्का बसला. ज्याचा फोटो त्याने एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत चक्क एका छोट्या बाथरुममध्ये कमोडच्या वर एक वॉशिंग मशीन फिट करण्यात आली होती, कमोड आणि खिडकीच्या मधल्या स्पेसमध्ये ही वॉशिंग मशीन बसवली होती, जेणेकरून वॉशिंग मशीनसाठी वेगळ्या जागेची गरज लागणार नाही.

फ्लॅटचे भाडे दरमहा थोडे थोडके नाही तर चक्क १.३५ लाख रुपये

या सगळ्यात सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे, या फ्लॅटचे भाडे दरमहा थोडे थोडके नाही तर चक्क १.३५ लाख रुपये इतके आहे. तसेच चार लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि १.४ लाख रुपये या फ्लॅटचे ब्रोकरेज आहे. या फ्लॅटचा फोटो शेअर करत उत्कर्ष गुप्ता यांनी लिहिले की, “फक्त मुंबईत तुम्ही तुमचे वॉशिंग मशीन फ्रंट लोड करू शकता आणि तुमचा कमोड टॉप लोड करू शकता, तेही दरमहा १.३५ लाख या परवडणाऱ्या किमतीत.”

मुंबईतील २ बीएचके फ्लॅटचं भाडं ऐकून युजर्स शॉक

दरम्यान, मुंबईतील पॉश भागातील इमारतीमधील फ्लॅटच्या भाड्याची रक्कम वाचून अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याची इमेजी शेअर केली आहे. तर अनेकांनी फार भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘पाली हिलमध्ये हे सर्व काही न्याय्य आहे.’ हा फ्लॅट हाऊसिंग डॉट कॉमवर लिस्टेट आहे, जे आठ मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असल्याचा उल्लेख आहे.

८५० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या फ्लॅटची जाहिरात “मुंबईतील परवडणारे भाड्याचे घर” अशी केली आहे. यात दोन बेडरूम, दोन बाथरूम आहेत, पण कोणतीही बाल्कनी नाही. हा २ बीएचके फ्लॅट पूर्णपणे फर्निश्ड आहे, त्यामुळे वांद्र्यातील पाली हिलसारख्या भागात या आकाराच्या घरासाठी १.३५ लाख रुपये भाडे अपेक्षित आहे, असेही काहीजण म्हणत आहेत.