Mumbai Flat Rent Viral Photo : मुंबईला ‘स्वप्नांचे शहर’ म्हटले जाते. जिथे लाखो लोक भविष्य घडवण्याच्या आशेने येतात. मनात अनेक स्वप्न घेऊन ते मुंबईत पाऊल ठेवतात, पण दुर्दैवाने मुंबई आल्यानंतर तिथे राहायचे कुठे असा प्रश्न अनेकांना सतावतो. यात मुंबईत सातत्याने वाढणाऱ्या घरांच्या किमतींमुळे भाड्याने घरं घेणंही अनेकांसाठी अवघड होऊन बसते. त्यामुळे मुंबईत दिवस काढताना अनेकांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मुंबईत घर खरेदी करणे दूरच, भाड्याने खोली घेणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. मुंबईत भाड्याच्या घरात राहताना लाखो रुपये पगार घेणाऱ्या लोकांची परिस्थिती कठीण होऊन जाते. अशात सोशल मीडियावर सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका व्यक्तीने मुंबईत पॉश भागात टू बीएचके फ्लॅट भाड्याने घेणेही किती मुश्कील आहे सांगितले आहे. यात त्याने त्या फ्लॅटच्या भाड्याची अशी काही किंमत सांगितली आहे की, जी वाचून तुम्हालाही घाम फुटेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा