आयुष्यात प्रत्येकाने स्वप्न पाहिली पाहिजे आणि ती पूर्ण केली पाहिजे. व्यक्तीच्या आयुष्यात स्वप्न असतील तर त्याला जगण्याची प्रेरणा मिळते. स्वप्न अनेकजण पाहतात पण ते पूर्ण करण्याची धमक फार मोजक्या लोकांमध्ये असते. व्यक्तीमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर त्याची स्वप्ने सत्यात उतरवू शकतात. सध्या अशाच एका तरुणाच्या प्रेरणादायी प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा तरुण आधी स्विगी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता आता ते एक फॅशन मॉडेल म्हणून काम करत आहे. कठोर परिश्रम करून आयुष्यात यशस्वी होणाऱ्या या तरुणाचा प्रवास अत्यंत प्रेरणा देत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
मुंबईतील रहिवासी असलेल्या साहिल सिंगने इन्स्टाग्रामवर त्याचा प्रेरणादायी प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. फूड डिलिव्हरी एजंटपासून ते मॉडेल म्हणून फॅशन शोमध्ये रँम्प वॉक करण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक शेअर केली आहे. व्हायरल क्लिपमध्ये, साहिल सिंगने शेअर केले की,”त्याने स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून दोन वर्ष काम केले आहे, बर्गर किंगमध्ये एक वर्ष शेफ म्हणून काम केले आणि आठ महिने “मँगो टार्ट” येथे काम केले. त्यानंतर साहिल फॅशन शोमध्ये मॉडेल म्हणून रॅम्पवर चालताना आणि फॅशन फोटोशूट करताना दिसत आहे.”
“डिलिव्हरी बॉय ते सेल्स एक्झिक्युटिव्ह ते मॉडेल,” असे कॅप्शन देऊन त्याने व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा:
व्हिडिओला चार दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनेत्री रिद्धिमा पंडितने टाळ्या आनंद व्यक्त केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “भाऊ रेस्टॉरंटमध्ये काम करणे बंद केले आणि एक मॉडेल म्हणून त्यांच्यासाठी काम करतो आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले केली, “तुम्हाला माहित आहे की, मला या वस्तुस्थितीची भीती वाटते की, आपल्याला माहित नाही की आपण कशात चांगले आहोत.”
हेही वाचा – “दिसतं तसं नसतं!” तुम्हाला व्हिडीओमध्ये पक्षी दिसतोय का? पुन्हा एकदा नीट बघा
“तुम्ही खूप प्रेरणादायी आहात! करत राहा, सुरू ठेवा, ” असे अन्य एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले.
गेल्या महिन्यात, ईशान्य भारतातील एका कलाकाराचा मुंबईत संघर्ष करणाऱ्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. Zomato डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणाऱ्या या तरुणाने मुंबईच्या झोपडपट्टीत रु. ५०० च्या रूमची फेरफटका मारली, ज्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांना मदत करण्यास प्रवृत्त केले.