Ghatkopar hoarding collapse: मुंबईत सोमवारी म्हणजेच १३ मे राजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा सुटलेल्या या वाऱ्यातच घाटकोपपरमधील एक भलंमोठं होर्डिंग कोसळलं. वादळ, पाऊस सुरु झालेला, त्यामुळे लोक पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. त्याचवेळी ही ह्दयद्रावक घटना घडली अन् होत्याचं नव्हतं झालं. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यासह कोसळणारा मुसळधार अवकाळी पाऊस मुंबईवर संकट घेऊन आला.

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईत जोरदार वारा सुटलेला असताना, छेडा नगरमध्ये जाहीरातीच एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. सगळा पेट्रोल पंप या होर्डिंगखाली दबला गेला. दुर्घटनेच्यावेळी पट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास १०० जण या पेट्रोल पंपावर होते. त्यावरुन पेट्रोल पंप किती मोठा होता? याची कल्पना येते. यानंतर या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला होता, दरम्यान आता दुर्घटनेनंतरचं भयान चित्र दाखवणारा आणखी एक व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Action by the Mumbai Board of MHADA in the case of extortion of Rs 5000 from the mill workers Mumbai print news
गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO

थरारक रेस्क्यू ऑपरेशन

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ हून अधिक लोक जखमी आहेत. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुर्घटनेनंतर बचावकार्य पार पडत आहे. यावेळी होर्डिंगखाली अनेक गाड्या लोक दबले गेले होते. गाड्यांचा तर संपूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. वेगवेगळ्या कार याखाली दबलेल्या दिसत आहेत. तसेच एक मोठा ट्रकसुद्धा याठिकाणी दिसत आहे. तर कारमध्ये अडकलेल्या एक मृतदेह काढण्याचं काम सुरु आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या अनेक गाड्या लोक या होर्डिंग खाली दबले गेले तर काहींचा निष्पाप बळी गेला. होर्डींगचे पत्रे, मोठ मोठे लोखंड अक्षरश: गाड्यांमध्ये घुसले आहेत. अजूनही याठिकाणी बचावकार्य सुरुच आहे.फलक काढण्याकरता अडचणींचा डोंगर उभा राहिला असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: दोघांनी हात पकडला, धबधब्यात उडी मारली, एक जण वर आलाच नाही; पालघरमध्ये नेमंक झालं काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत केली जाईल.  या जाहिरातीच्या फलकालाच्या मंजुरीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

वडाळ्यातही पार्किंग टॉवर कोसळला

दुसरीकडे कांजूरमार्ग पूर्वच्या इंदिरानगर भागात एका बिल्डिंगचं छप्परही कोसळलं. तर वडाळ्यातही बघता बघता पार्किंग टॉवर कोसळला.