हॉस्टेल म्हणजेच वसतिगृहातील दिवस हे आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतात. हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तरुण आई-वडीलांच्या मदतीशिवाय, कुटुंबाशिवाय एकटे राहायला शिकतात. खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला सुरुवात करतात. हॉस्टेलमध्ये राहताना स्वत:चे काम करायला भाग पाडून स्वावलंबी व्हायला शिकवत आणि आयुष्य जगण्याची शिस्त लावतात. हॉस्टेलवर एकटे राहताना जबाबदारीची जाणीव होते आणि जबाबदारी स्वीकारायला शिकतात. हॉटेलामध्येचं तरुण नवीन मित्र-मैत्रिणी बनवायला, मजा-मस्ती करायला आणि आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकतात. प्रत्येकाने एकदातरी हॉस्टेलमधील आयुष्य जगले पाहिजे, अनुभवले पाहिजे. अशाच एका हॉस्टेलमधील आयुष्याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहर्‍यावरही हसू आले आहे.

मुंबईतील एका मुलींच्या हॉस्टेलमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तरुणी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा आनंद लुटताना दिसत आहे. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींनी जोरजोरात गाणी लावून नाचताना दिसत आहे. मुलींचा धिंगाणा ऐकून हॉस्टेलच्या वॉर्डन त्यांना रोखण्यासाठी तिथे आल्या पण पुढे जे घडले त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

little girl dance
‘मराठी मुलगी आली…’ लहान मुलीने केला ‘छम छम करता है’ गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
shocking video
पर्यटकांच्या अंगावर कोसळला बर्फाचा भलामोठा भाग अन् …, बर्फाळ प्रदेशात जाण्याआधी हा अंगावर काटा आणणारा Video एकदा पाहाच
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Rumeysa Gelgi explained why she flies on a stretcher
जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगायला आलेल्या हॉस्टेलच्या वॉर्डन मुलींनी नाचायला भाग पाडले. वॉर्डन तिथे आल्यानंतर एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे. तरुणींचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन बंद करण्याऐवजी त्यांच्या आग्रहाला मान देऊन वॉर्डनही डान्स करू लागतात. सुरुवातीला त्या संकोच करतात पण हॉस्टेलमधील तरुणींना मजा मस्ती करताना पाहून त्यांनाही नाचण्याचा मोह होणे सहाजिक आहे, शेवटी तिही माणसंच, आनंदाने जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. हॉस्टेलच्या वॉर्डन देखील नाचताना पाहून मुलींचा उत्साह आणखीच वाढला. वॉर्डनच्या डान्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हिडिओ निधी नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आनंद पसरवून नेटकऱ्यांना हसायला भाग पाडत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वॉर्डन आयी थी रोकने, उन्हे भी नचवा दिया (वॉर्डन आम्हाला थांबवायला आली होती पण त्यांना पण नाचायला लावले.”

हेही वाचा – Fact Check : पाणीपुरी विक्रेत्याने ४० लाख कमावल्याचा दावा खोटा! जीएसटी नोटीसच्या व्हायरल फोटोचे जाणून घ्या सत्य….

व्हिडिओ येथे पाहा

सोशल मीडिया वापरकर्ते सर्व वॉर्डनचा डान्स आवडला आहे. “वॉर्डन भी माँ होती है कभी कभी, वो भी समझती है बचाओ की खुशी को (कधीकधी वॉर्डन ही आईसारखी असते; तिला मुलांचे सुख समजते),” असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा –“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

दुसरा वापरकर्ता पुढे म्हणाला, “आमची वॉर्डन फक्त दंड लावत असते.”

नेटकख्यांनी मुली आणि मुलांच्या आपल्या हॉस्टेलमधील वॉर्डनबरोबर देखील तुलना केली, अनेकांनी त्यांचे किस्से सांगितले.

व्हिडिओला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत, वापरकर्त्यांनी वॉर्डन आणि तिच्या विद्यार्थ्यांमधील दुर्मिळ क्षणाचे कौतुक केले आहे.

Story img Loader