Mumbai Hotel Splitting Split AC Between Two Rooms: ‘गरज ही शोधाची जननी आहे,’ असं म्हटलं जातं. त्यातही भारतासारख्या मोठ्या देशामध्ये असे शोध लावणारे अनेक गरजवंत पावलोपावली सापडतात असं म्हटलं तरी हरकत नाही. सोशल मीडियावर अनेकदा अशा गरजूंनी शोधलेल्या भन्नाट कल्पना व्हायरल होत असतात. अनेकदा या कल्पना आणि त्यातून निर्माण झालेल्या भन्नाट गोष्टी पाहून भारत हा जुगाडूंचा म्हणजेच काहीही करुन काम होईल असं पाहणाऱ्यांचा देश आहे असंही म्हटलं जातं. थोडं संभाळून घ्या या सवयीचा भारतीयांवर सर्वाधिक प्रभाव असल्याचंही असे जुगाड पाहिल्यावर म्हटलं जातं.
सोशल मीडियावर तर रोज असे अनेक व्हिडीओ आणि फोटो पहायला मिळतात. सध्या असाच एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो आहे स्पील्ट एसीचा. आता हा वाटतो तसा साधा एसी नसणार हे सहाजिक आहे. अनुराग वर्मा नावाच्या व्यक्तीने २०११ मध्ये मुंबई दौऱ्यादरम्यान काढलेला हा फोटो आहे. एसी रुममध्ये राहता यावं म्हणून अनुरागने हॉटेलमध्ये बुकींग केलं. मात्र आपल्या रुममधील एसी हा खरोखरच शब्दश: स्पील्ट एसी आहे याची कल्पना अनुरागला नव्हती. त्याने या एसीचा फोटो काढून ठेवला होता. हा एसी अशाप्रकारे भिंतीवर लावण्यात आला होता की एकाच वेळी तो दोन खोल्यांमध्ये अर्धा अर्धा वापरता येत होता.
भिंतीला भगदाड पाडून हा एसी दोघात एक तत्वानुसार दोन खोल्यांना एकाच वेळी सेवा देण्यासाठी वापरण्यात आलेला. अनुरागने फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये अर्धा एसी मी असलेल्या खोलीला थंड करत होता तर उरलेला अर्धा भाग दुसऱ्या खोलीत थंड हवा देत होता. विशेष म्हणजे शेजारच्या खोलीमध्ये असणारे दोघे मध्यमवयीन शेजारी हे रात्रीच्या चार वाजेपर्यंत ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटातील ‘ए गणपत’ गाणं लावून बसलेले असंही अनुरागने सांगितलं आहे.
बरं आता हा फोटो पाहिल्यावर आपल्याला एसी ऑपरेट करायचं असेल तर काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर या एसीचा रिमोट या खोल्यांमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या ग्राहाकांना दिलाच जात नव्हता असं अनुराग सांगतो. “रिमोट नव्हताच या एसीला. एसीचं तापमान २४ वर सेट करण्यात आलं होतं,” अशी प्रतिक्रिया अनुरागने रिमोटसंदर्भात एकाने विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे. अन्य एका ट्वीटमध्ये अनुरागने या व्हायरल फोटोवरुन झालेल्या बातमीची लिंक शेअर करत आता ‘हा चर्चेचा राष्ट्रीय विषय झाला आहे’, असंही म्हटलंय.
अनेकांनी या ट्वीटवर मजेदार रिप्लाय दिले आहेत. त्यातील काही रिप्लाय पाहा…
१)
२)
३)
४)
अनुरागच्या या फोटोला सात हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.