टाटा समूहाचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे प्राण्यांवर विशेषत: कुत्र्यांवर असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. ते अनेकदा कुत्र्यांचे फोटो पोस्ट करतात आणि त्यांच्या हक्कांसाठी लढतात. दरम्यान अलीकडेच टाटा यांनी इंस्टाग्रामवर मुंबईकरांना तातडीने मदतीची आवाहन केले. स्मॉल ॲनिमल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या कुत्र्यासाठी रक्तदाता शोधण्याची विनंती केली. या ७ महिन्यांच्या कुत्र्याला ताप आणि तीव्र अशक्तपणा आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुत्र्याचा जी वाचवण्यासाठी एका रक्तदात्या कुत्र्याच्या मदतीची तातडीने गरज असल्याचे आपल्या पोस्टमध्ये सांगितले.तसेच रक्तदाता कुत्र्यांसाठी पात्रता निकष सांगितले आणि आजारी कुत्र्याचा फोटो देखील शेअर केला आहे. “मी तुमच्या मदतीची खरोखर प्रशंसा करेन,” असे मुंबईकरांकडून पाठिंबा मिळवण्याच्या आशेने लिहिले. अधिकाअधिक लोकांपर्यंत मदतीचे आवाहन पोहचावे यासाठी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही त्या आजारी कुत्र्याचा फोटो शेअर केला आणि “मुंबई, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे.”अशी विनंती केली.

टाटां यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे त्यांच्या या प्रेमळ मित्रांबद्दल त्यांच्या मनात किती करुणा हेच स्पष्ट होते. मुंबईकरांना केलेले हे आवाहन प्राणी कल्याणासाठी समर्थन करण्यासाठी त्याच्या चालू असलेल्या प्रयत्नांना दर्शवते आहे.

हेही वाचा – “हेल्मेटने तारले! डोक्यावरून कार जाऊनही थोडक्यात वाचला दुचाकीस्वार, थरारक अपघाताचा Video Viral

प्राण्यांच्या कल्याणाप्रती आपली बांधिलकी दर्शवत टाटा ट्रस्टने अलीकडेच दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी परिसरात देशातील पहिले अत्याधुनिक लहान प्राणी रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. प्राण्यांसाठी असलेल्या या आरोग्य केंद्रात २०० खाटांची क्षमता असेल, ज्याचा उद्देश गरजू पाळीव प्राण्यांसाठी प्रगत वैद्यकीय सेवा प्रदान करणे आहे.

हेही वाचा – नऊवारी लयभारी! जर्मन महिलेचा मराठमोळा अंदाज; कपाळी कुंकू अन् हातात टाळ घेऊन करतेय दहा वर्षांपासून आषाढी वारी

एका कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी रतन टाटांची पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतूक केले आहे. एकाने लिहिले की, “जर रतन टाटा सर हे करू शकतात तर आपण का नाही?”

दुसऱ्याने लिहिले की, एक महापुरुष कुत्र्यासाठी रक्ता मिळावे म्हणून पोस्ट करतो जो त्यांचा स्वत:चा देखील नाही. हा नम्रतेचा सुवर्ण धडा नाही तर काय आहे?”

तिसऱ्याने लिहिले, ” भारतातील एकमेव असा व्यक्ती ज्याचा कोणीही द्वेष करत नाही”

चौथा म्हणाला, “तुम्ही या जगाला देवाची देणगी आहात सर, किंवा तुम्ही स्वतः देव आहात”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai i need your help ratan tatas urgent plea to find blood donor for stray dog snk