Mumbai Video : महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. दर दिवशी हजारो लोकं मुंबईत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात म्हणूनच मुंबईला स्वप्ननगरी म्हणतात. जो या शहरात येतो, त्याला या शहराचं वेड लागतं. कुणी जॉबसाठी, तर कुणी शिक्षणासाठी, येथे प्रत्येक जण आपआपली स्वप्ने घेऊन जगतात. देशाच्या कानाकोपऱ्यापासून ते देशाच्या बाहेरील लोकांना सुद्धा मुंबई तितक्याच आपुलकीने जवळ घेते.म्हणून मुंबईत येणारा प्रत्येक जण मुंबईच्या प्रेमात पडतो.
मुंबईचा समुद्र असो की येथील वडापाव, लोकल असो की येथील उंच गगनचुंबी इमारती, कुणालाही खास आकर्षण वाटतं. मुंबईचं सौंदर्य न मोजता येईल इतके आहे. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया, चौपाटी, जुहू बीच, सिद्धिविनायक मंदिर, हाजी अली, वर्सोवा बीच,मरीन ड्राईव्ह असे कितीतरी ठिकाणे आहेत जे आजही मुंबईचं सौंदर्य जपताहेत.
असं म्हणतात, मुंबईला जर भेट द्यायची असेल किंवा येथील सौंदर्य बघायचं असेल तर सर्वोत्तम काळ हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी असतो. हा काळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी उत्तम असतो. या दरम्यान हिवाळा ऋतू असतो आणि वातावरणात गारवा जाणवतो. हिवाळ्यातील मुंबई तुम्ही कधी बघितली का? सोशल मीडियावर हिवाळ्यातील मुंबईचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हिवाळ्यातील मुंबईचे चित्रीकरण केले आहेत.
हेही वाचा : VIDEO : बापरे! शाळेत खेळताना विद्यार्थ्यांना दिसला भलामोठा अजगर, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीला कुलाबा कॉजवेचे दृश्य दाखवले आहे. त्यानंतर गेटवे ऑफ इंडियासमोर कबुतरांची शाळा भरलेली दिसत आहे.त्यानंतर व्हिडीओत सुंदर ताज हॉटेल दाखवले आहेत. व्हिडीओत पुढे दिसेल की गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्र किनाऱ्याच्या चौपाटीवर कुत्रा निवांत बसलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मुंबईत जावंस वाटू शकते. मुंबईचे हे सौंदर्य आकर्षित करणारे आहेत.
mumbaicha_mulgaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हिवाळ्यातील मुंबई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप आनंददायी वातावरण आहे.” तर एका युजरने विचारलेय, “मुंबईमध्ये थंडी असते का?” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर इमोजी शेअर केले आहेत.