Mumbai Juhu Viral Video : राज्यात गेल्या सहा महिन्यांत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली असून, राज्यात सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटनांत मुंबई पहिल्या स्थानावर; तर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच आता मुंबईच्या जुहू परिसरात एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. रात्रीचे महिलांसाठी घराबाहेर पडणे सुरक्षित नाही; मात्र आता दिवसाही महिलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. जुहू येथे भररस्त्यात एका तरुणाने महिलेला आवाज देऊन महिलेसमोर पँट काढून गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की मुंबईत चाललंय तरी काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेला पाहून तरुणाने काढली पँट

हा सगळा प्रकार जुहू येथील जानकी कुटीर परिसरात आज सकाळी ८.५५ वाजण्याच्या सुमारास घडला असून, महिलेने सांगितल्यानुसार या तरुणाने महिलेला पाहून पँट काढत गैरवर्तन केले. त्यानंतर संबंधित महिलेनेच याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. महिलेने तरुणाचा चेहरा मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या ठिकाणावरून तरुणाने पळ काढल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या घटनेनंतर महिलेने निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र निर्भया पथकाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे या महिलेने म्हटले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत मागितली मदत

त्यानंतर महिलेने आपली तक्रार एक्स या सोशल माध्यमातून मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्याशिवाय पोलिसांनी या ठिकाणी अधिक सुरक्षा वाढवावी, अशी विनंतीदेखील केली आहे. महिलेने सोशल मीडियावर हा प्रकार शेअर करीत दावा केला की, त्याच भागात तिसऱ्यांदा अर्धनग्न पुरुषांनी तिचा मानसिक छळ केला आहे. या महिलेने सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोप केला आहे की, रस्त्याच्या मधोमध त्याने पँट काढल्यानंतर काही पुरुष तिला मोठ्याने हाक मारून, त्याच पद्धतीने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करीत होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दारुचा ट्रक रस्त्यावर पलटी; जखमींना सोडून लोकांचा मात्र दारुवर डल्ला, संतापजनक Video होतोय व्हायरल

मुंबई पोलिसांनी घेतली दखल

मुंबई पोलिसांनी या पोस्टची दखल घेतली आणि तिच्या संपर्क साधून तपशिलांची मागणी करीत तिच्या पोस्टला उत्तर दिले. महिलेने असा दावा केला की, तिने निर्भया पथकाला कॉल करण्याचा प्रयत्न केला; परंतु तिच्या फोन कॉलला उत्तर मिळाले नाही. महिलेने व्हिडीओ शेअर करीत, “जुहू, जानकी कुटीर एरिया. हा माणूस रस्त्याच्या मधोमध जोरात मला हाक मारत पँट काढून गैरवर्तन करताना दिसला. आज सकाळी ८.५५ वाजता माझ्यासोबत वेगवेगळ्या पुरुषांकडून असे घडण्याची ही तिसरी वेळ आहे”, अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. ती पुढे म्हणाली, “मी तुम्हाला या क्षेत्राची सुरक्षा वाढवण्याची विनंती करते. कारण- या ठिकाणी अनेक महिलांना अशाच त्रासदायक गोष्टींचा अनुभव आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai juhu viral video woman alleges harassment claims men call her out loud with pants down in juhu street shares video srk