Mumbai Video : महाराष्ट्राची राजधानी मुंबई अनेकांची स्वप्ननगरी आहे.येथे प्रत्येक जण धावताना पळताना दिसतो. दर दिवशी हजारो लोक येथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबईने सर्वांना आपले करुन घेतले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई आपलीशी वाटते. मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल तर मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दरदिवशी हजारो लोकं लोकलमधून प्रवास करतात. एकदिवस सुद्धा लोकल बंद असेल तरी मुंबईकरांचा टाइमटेबल विस्कटतो. नोकरी करणारे असो वा विद्यार्थी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत; प्रत्येकजण मुंबईच्या लोकलवर अवलंबून असतो.
मुंबईकरांचा जीव की प्राण असणारी लोकल अनेकांना आपलीशी वाटते. लोकलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकलमध्ये कधी मजेशीर गोष्टी पाहून हसायला येते तर कधी भावनिक गोष्टी ऐकून डोळ्यात पाणी येतं. काही व्हिडीओ तर थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणाने लोकलमध्ये एक अनोखा जुगाड केला आहे. लोकलमध्ये भयंकर गर्दी असते. या गर्दीत फोन वापरता यावा म्हणून तरुणाने चक्क लोकलच्या दरवाज्यात बाहेरच्या बाजूला फोन अडकवला. त्याचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की समोरुन एक लोकल ट्रेन जात आहे. लोकलच्या एका डब्ब्यात खूप गर्दी आहे. अशात एका तरुणाने या गर्दीत फोन हातात ठेवण्यापेक्षा लोकलच्या दरवाज्यात बाहेरच्या बाजूला फोन अडकवला आहे आणि इअरफोनच्या मदतीने तो फोन वापरताना दिसतोय. तुम्ही नीट पाहाल तर या तरुणाची ऑनलाईन मीटींगमध्ये सुरू आहे. हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल.
हेही वाचा : “हाडं आहेत की नाही भावा…” चिमुकल्याने केला हातावर ब्रेक डान्स, टॅलेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
_aamchi_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फक्त मुंबईत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मुंबईत नेहमी काहीतरी नवीन पाहायला मिळतं” तर एका युजरने लिहिलेय, “रेल्वेवर डोळे झाकून विश्वास ठेवणारे…” आणखी एका युजरने लिहिलेय, “जुगाड टेक्नोलॉजी”