Mumbai local Viral video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र आता याच लाइफलाइनचा हा प्रवास जीवघेणा ठरत चालला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनने अनेक प्रवासी प्रवास करतात. पण, जर सकाळ आणि सायंकाळची वेळ असेल तर चाकरमान्यांची तोबा गर्दी रेल्वेस्थानकावर दिसून येते. अशात जर सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसला जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकलमध्ये चढतो. यामध्ये सगळ्यात वेळखाऊ काम म्हणजे या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणं. ब्रिज चढा, मग उतरा यातच वेळ जातो आणि नेहमीची लोकल जाते. मात्र, यावर आता मुंबईकरांनी जुगाड शोधला आहे. दादर स्थानकावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म

हा व्हिडीओ दादरमधील पश्चिम रेल्वे मार्गावरील असून दादर स्टेशनवरची गर्दी मुंबईकरांना वेगळी सांगायला नको. दादर स्टेशनला चढणं आणि उतरणं म्हणजे मोठा टास्कच. मात्र या प्रवाशांनी काय जुगाड केलाय ते तुम्हीच पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही प्रवासी थेट ट्रेनमधून लोखंडी जाळी ओलांडत आहे. लोकांनी रेल्वे ट्रॅक ओलांडू नये म्हणजे लोखंडी कुंपण लावण्यात आलंय. पण प्रवाशांनी त्या लोखंडी पट्ट्या तोडल्या आणि त्या छोट्याशा मार्गातून प्लॅटफॉर्म ओलांडू लागले. अशा पद्धतीनं भर गर्दीत १ सेकंदात प्रवाशांनी प्लॅटफॉर्म बदलला. यामध्ये वेळ जरी वाचत असला तरी फार भयंकर दिसत आहे, कारण जर ट्रेन सुरु झाली तर यामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.

खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा >> प्रत्येकाचं आयुष्य हे सारखं नसतं! एकीकडे आवड तर दुसरीकडे जबाबदारी; VIDEO पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावतील

सोशल मीडियावर हा व्हिडीओ borivali_churchgate_bhajan या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local at dadar station viral video passenger takes a risky pathway to change platforms srk