Central Railway Fast Trains Update: मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.
प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.
हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘ती’ माईक व स्पीकर घेऊन चढली; प्रत्येक शब्दाला उंचावल्या प्रवाशांच्या भुवया, Video पाहा
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.