मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करीत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. अशातच लोकलमध्ये होणारी भांडणं आपल्याला काही नवीन नाहीत.
सोशल मीडियावर अनेकदा अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात या व्हिडीओमध्ये ज्यात मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात दोन माणसांमध्ये जोरदार वाद होतो आणि हा वाद मारामारीपर्यंत पोहोचतो.
मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये पुरूषांचा राडा
मुंबई लोकलच्या आणखी एका व्हिडीओची चर्चा सध्या इंटरनेटवर होतेय. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात दोन माणसांमध्ये वाद झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. वाद इतका टोकाला गेला की तो मारामारीपर्यंत पोहोचला. सीटमुळे झालेल्या भांडणात सुरूवातीला दोघांमध्ये वाद झाला आणि शिवीगाळ झाली. त्यानंतर समोरचा माणूस निघणार इतक्यात दुसऱ्याचा राग अनावर झाला म्हणून त्याने चक्क समोरच्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्याला पकडून ट्रेनच्या सीटवर बसवल आणि उलटं करून त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. यामुळे आजूबाजूला गर्दी जमली आणि लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावर ज्याला मारहाण केली तोही भडकला आणि त्याला म्हणाला “शिव्या काय देतोस. बस कर आता.”
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @indiansoninternett या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुंबई लोकलमध्ये सीटवरून दोन माणसांमध्ये वाद” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
मुंबई लोकलमधील मारामारीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बघा फर्स्ट क्लासवाले शिकलेली श्रीमंत माणसं” तर दुसऱ्याने “हे खूप सामान्य झालं आहे आता, त्यांचा ग्रुप असतो आणि ते इतरांना बसू देत नाहीत.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मराठी माणूस फक्त मराठी माणसालाच मारू शकतो, बाकीच्यांना मारायला यांच्यात दम नाही”