Mumbai Local Kalyan Fast Train: मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन ही अशक्य वाटणाऱ्या अनेक अविश्वसनीय गोष्टींचा खजिना आहे. म्हणजे इथे कधी काय होईल याचा जराही अंदाज लावता येत नाही. याच लोकलमध्ये आपल्याला बऱ्याचदा अवलिया कलाकार भेटतात, रबर-पिना, कानातले विकणारा दादा असो किंवा संत्री- लिंबू विकायला आलेली मावशी असो एकाएकाच्या तऱ्हाच वेगळ्या असतात. आता या अवलिया प्रवाशांना शोभायला रेल्वे सेवा पण काही मागे नाही बरं. अलीकडेच मध्य रेल्वेच्या एका स्थानकात रेल्वे रुळावर दिसलेलं एक दृश्य तुम्हाला रेल्वेच्या क्रिएटिव्ह डोक्याची साक्ष पटवून देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर @malangad__45 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मुंबई लोकलच्या रुळावरून चक्क एका जेसीबी धावत असल्याचे दिसत आहे. तुम्हाला आठवत असेल तर जेसीबीची गाडी ही मध्यंतरी मीमर्स लोकांमध्ये खूप ट्रेंडिंग विषय होता आणि त्यात आता रुळावरून जेसीबीची पळापळ बघताना नक्कीच नेटकरी थक्क झाले असणार. स्थानकात उपस्थित असणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला होता आणि आता सोशल मीडियावर ही कल्याणपर्यंत धावणारी नवीन सुपर फास्ट ट्रेन अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल झाला.

हे ही वाचा<< IND vs PAK दरम्यान प्रेक्षकांनी दिल्या हिंसक मुस्लिम विरोधी घोषणा! Video मुळे वाद सुरु, तुम्हाला हे माहितेय का?

अर्थातच जितका व्हिडीओ विचित्र असतो तितक्याच कमेंट्स सुद्धा क्रिएटिव्ह असतात हे सोशल मीडियाचं गणित तुम्हालाही माहित असेल. त्यामुळे या ही व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट मजेशीर कमेंट करून धम्माल केली आहे. ‘प्रवाशांनी पुढच्या फळीत बसून जायचं का?’, ‘अरे वाह्ह ही तर जेसीबी एक्सप्रेस’ अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आहेत. काहींनी तर हा व्हिडीओ एडिट केलेला असावा अशीही शक्यता वर्तवली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local kalyan fast train is a new jcb running on track netizens make funny memes will make you rofl watch here svs