Mumbai local viral video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मात्र, सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या घरासारखं रुप येतं. दरम्यान एका तरुणीचा मुंबई लोकलमध्ये गवळण गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.

गौळण हा मराठी लोकसाहित्यातील हा एक गीतप्रकार. कृष्णाच्या बालक्रिडा, त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गौळणींनी यशोदेकडे आणलेल्या तक्रारी, त्यांतूनच गौळणींनी मांडलेले कृष्णदेवाचे प्रच्छन्न ‘कवतिक’, गौळणींना वेडावून टाकणारी कृष्णाची मुरली, कृष्णाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या गौळणींचा विरहभाव ह्यांचा भावोत्कट आविष्कार गौळणींत आढळतो. ह्या विशिष्ट गीतप्रकारास ह्यामुळेच ‘गौळण’ असे नाव पडले आहे. अशातच एका तरुणीने लोकल ट्रेनमध्ये गोड गाणे गात प्रवाशांचे मन जिंकले. या अनोख्या संगीतमय अनुभवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकजण तिच्या गायनाचे कौतुक करत आहेत. या गाण्याने प्रवाशांचा थकवा दूर करून त्यांना काही क्षणांसाठी आनंद दिला.

“आरे थांब थांब कान्हा जाऊ नको राना, जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का?” असे या गवळणीचे बोल आहेत. ही तरुणी अगदी तालात ही गवळण बोलत आहे. व्हिडिओत पुढे तुम्हाला पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे, ज्यात एक तरुणी खिडकीकडे उभी राहून गाणं गात आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून ती तरुणी एका जागी उभी राहून, “आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का?” हे गाणं गात आहे. तसेच ही तरुणी सुंदर साडी परिधान केल्यामुळे आणखी देखणी दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/watch/?v=1093141012353511

हेही वाचा >> काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात…म्हणत नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीच लोकल ट्रेन अनेकांसाठी दुसरं घर आहे. त्यामुळे आपण घरी जसे सण साजरे करतो तसेच सण मुंबई लोकलमध्येही साजरे केले जातात.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ फेसबूक वर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader