मुंबई लोकल लाखो प्रवाशांची पहिली पसंती आहे. कमी खर्चिक आणि जलद असा हा प्रवास अनेकांना दररोज करायला आवडतो. मुंबई लोकलच्या बघायला गेलं तर तशा दोन बाजू आहेत. रोज सीटवरून भांडण, हाणामारी, विचित्र स्टंट तर होतंच असतात. पण, पुरुषांच्या डब्ब्यात सकाळी भजन, मैत्रीण पुढच्या स्टेशनला चढणार म्हणून राखून ठेवलेली सीट, तर ट्रेनच्या काही मित्र-मैत्रिणींशी अनोखं नातं आदी चांगल्या गोष्टीही घडताना दिसतात. पण, या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम ती म्हणजे या ट्रेनमधील ‘गर्दी’… बरोबर ना?

सकाळी ऑफिसला जायच्या वेळेत तर संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या दरम्यान ट्रेनला प्रचंड गर्दी असते. कधी कधी ऑफिसला जायला उशीर झाला असेल तरी ट्रेन सोडावी लागते. पण, काही जण याला अपवाद असतात ; जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गर्दीत चढतात आणि मग दरवाजाला लटकून प्रवास करतात. कधी ट्रेन उशिरा, तर कधी मेगा ब्लॉक, तर अनेकदा रेल्वे रुळांच्या किंवा इतर काही अनेक कारणांमुळे ट्रेनला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांनी या ट्रेन तुडुंब भरलेल्या असतात. तर आज सोशल मीडियावर १९७० च्या दशकातील पश्चिम रेल्वेच्या एक फोटो व्हायरल होत आहे.एकदा तुम्हीसुद्धा बघा हा फोटो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…चित्रकाराची किमया! एअर होस्टेसचं बनवलं खास डूडल; कलाकारी पाहून ‘तिने’ काय दिलं रिटर्न गिफ्ट? VIDEO तून बघा

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता की, १९७० च्या दशकातील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत पश्चिम रेल्वेच्या खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून काही प्रवासी प्रवास करत आहेत. ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरलेली तर आहेच. पण, काही प्रवासी दरवाज्यावर लटकताना दिसत आहेत. एवढ्या वर्षांत ‘काहीही बदललेले नाही’ असे सांगत नेटकरी हा फोटो विविध कॅप्शन देऊन रिपोस्ट करताना दिसून येत आहेत. एकदा पाहाच नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या मिम्स आणि पोस्ट.

नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या पोस्ट…

सोशल मीडियावर ही पोस्ट @IndiaHistorypic या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘मुंबई १९७० चा लोकल ट्रेन प्रवास’ ; अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी हा फोटो पाहून व काल ठाण्यात घडलेल्या घटनेची तुलना करत आहेत. काल ठाणे रेल्वेस्थानकावर एक थरारक घटना घडली. ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरू होती, याचवेळी महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेनखाली अडकली. तर ही घटना लक्षात घेऊन नेटकरी अनेक मिम्स शेअर करत आहेत आणि सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे

Story img Loader