New Year Celebrations: घड्याळातले दोन्ही काटे १२ वर येऊन थांबले आणि शहरभर ‘हॅप्पी न्यू इअर’चा एकच जल्लोष झाला. नंतर तासभर सुरू होता तो शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्साहाचा महोत्सव.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, हॉटेल, पबकडे मुंबईकरांची पावले वळली. त्यामुळे जुहू चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह येथे संध्याकाळपासून प्रचंड गर्दी होती. परिणामी अनेक भागांत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर मोठी वर्दळ आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंब कबिल्यासह बाहेरगावी गेले आहेत. मात्र ज्यांना काही कारणामुळे पर्यटनस्थळी जाता आले नाही असे मुंबईकरंनी प्लॅटफॉर्मवरच नवीन वर्षाचं स्वागत केलं. सीएसएमटी स्थानकावरचा रात्री १२ वाजताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सीएसएमटी स्टेशन दिसून येत आहे. सीएसएमटी स्टेशनवर अनेक प्रवाशी आहेत जे तिथे असलेल्या घड्याळमध्ये १२ वाजण्याची वाट पाहत असतात. स्टेशनवर असलेल्या इंडिकेटरवर १२ कधी वाजतात ते मोजत असतात, ज्या क्षणी १२ वाजतात तेव्हा ट्रेनचे हॉर्न वाजत नवीन वर्षाचे स्वागत केले. अनेकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Passengers inside metro over seat issues shocking video goes viral on social media
हद्दच झाली! मेट्रोमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मात्र, सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या घरासारखं रुप येतं. अशाच मुंबई लोकलच्या प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरच नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?

नव्या वर्षाचे सर्वप्रथम स्वागत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होते. न्यूझीलंडमधील ऑकलंड हे नवे वर्ष सुरू होणारे जगातील पहिले मोठे शहर… ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील जगप्रसिद्ध ‘ऑपेरा हाऊस’ आणि त्यालगतच्या ‘हार्बर ब्रिज’च्या आसमंतामध्ये नववर्षाच्या स्वागताला आतषबाजी केली जाते. यंदाही २०२४ला निरोप देताना आणि २०२५चे स्वागत करताना सिडनीचे आकाश रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाले.

Story img Loader