New Year Celebrations: घड्याळातले दोन्ही काटे १२ वर येऊन थांबले आणि शहरभर ‘हॅप्पी न्यू इअर’चा एकच जल्लोष झाला. नंतर तासभर सुरू होता तो शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्साहाचा महोत्सव.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, हॉटेल, पबकडे मुंबईकरांची पावले वळली. त्यामुळे जुहू चौपाटी, मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह येथे संध्याकाळपासून प्रचंड गर्दी होती. परिणामी अनेक भागांत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर मोठी वर्दळ आणि काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंब कबिल्यासह बाहेरगावी गेले आहेत. मात्र ज्यांना काही कारणामुळे पर्यटनस्थळी जाता आले नाही असे मुंबईकरंनी प्लॅटफॉर्मवरच नवीन वर्षाचं स्वागत केलं. सीएसएमटी स्थानकावरचा रात्री १२ वाजताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा